Darshana Pawar हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक
0Tejwarta News Networkजून २२, २०२३
Darshana Pawar हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक
दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. राहुल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबईतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक आहे. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एम पी एस सी ची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारीकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली. x
stay connected