आमदार आशोक पवार यांच्या हस्ते शांततेचा संदेश देणारा 'लव्ह जिहाद...?' चे पोस्टर जाहीर

 आमदार आशोक पवार यांच्या हस्ते शांततेचा संदेश देणारा 'लव्ह जिहाद...?'  चे  पोस्टर जाहीर



लव्ह जिहाद हा लघुपट  समाजाचे वास्तवावरील भाष्य करणारा व शांततेचा संदेश देणारा लघुपट आहे. हे पण लव्ह जिहाद का ? प्रेमाला जात धर्म असतो का ? असा प्रश्न या व्यवस्थेला विचारणारा लघुपट आहे. दोन्ही समाजातील गैरसमज दूर करून शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर आमदार आशोक बापू पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. 

     लव्ह जिहाद लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक  विशाल नामदेव सिरसट. सहनिर्माते दादासाहेब गोसावी, शीतल गोसावी व पप्पू पानझाडे. या लघुपटात मुख्य भूमिकेत विजय जायभाये व तेजल मेने यांनी अभिनय केला आहे. तसेच चित्रपट निर्माते संदीप राक्षे यांनी मुलाच्या वडिलाची व सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुलकर्णी यांनी मुलाच्या आईची भूमिका साकारली आहे. या लघुपटातून प्रतिमा शिंदे यांनी पदार्पण केले आहे. तसेच सुप्रसिद्ध लेखक, कवी व अभिनेते विनायक रायकर यांनी हि या लघुपटात भूमिका साकारली आहे. तसेच बालकलाकार शिवम गोसावी याने हि उत्तम अभिनय केला आहे. या लघुपटाचे संकलन सचिन मोरे व विशाल सिरसट, रंगभूषा व वेशभूषा वैष्णवी पानझाडे, छायांकन सचिन मोरे व अक्षय पालके, संगीत सचिन मोरे. रेकॉर्डिंग अनिरुद्ध शिंदे ओरीजनल किंग व द वयक्तिक प्रोडक्शन या निर्मिती संस्थेने या लघुपटाची निर्मिती केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.