अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- - - - - - - - - - - - - - - - -
जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण )
जामखेड - अहमदनगरच अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेत घेताच मोठा जल्लोष झाला. या ऐतिहासिक घोषणेचे आपण साक्षीदार याचा आपल्याला अभिमान आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते चोंडी (ता.जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती उत्सवनिम्मित बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा सदाशिव लोखंडे, खा सुजय विखे, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार गोपीचंद पडळकर, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले यांच्यासह आदी आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उल्लेखनीय कार्य केलेल्या जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यातील एक अशा १४ महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील जयंतीच्या वेळेस येथे राजकारण करण्यात आले. त्यांना आठच दिवसांत पायउतार व्हावं लागले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत अशा घटनांना थारा मिळत नाही याचं हे उदाहरण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या राज्य कारभारात सर्वाना सोबत घेत प्रशासन चालविले ते आजदेखील सर्वाना भावत आहे. ३०० वी जयंती जगाला हेवा वाटेल अशी करण्याचा मानस एकनाथ शिंदे यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वांना सोबत घेत न्यायचं राजकारभार आजदेखील सर्वासाठी मार्गदर्शक ठरत आहे. मुख्यमंत्री शिंदेच्या मार्गदर्शनाखाली अनेक जिल्ह्याचं नामांतर करण्यात आले आहे तुमच्या भावना लक्षात घेत अहमदनगरच अहिल्यानगर करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी उपस्थितांना दिले. पुण्यश्लोक अहिल्यामातेनी आम्हा दोघांना त्यांच्या कल्याणकारी योजना राबविण्याची शक्ती देवो असा आशीर्वाद मागितला. २५ हजार घरे धनगर समाजासाठी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे.
प्रास्ताविक करताना राम शिंदे म्हणाले की, जास्त बोलायची इच्छा नाही. पण ऐकून घ्यायची सवय हवी. नाहीतर काय होत हे सर्वांनी पाहिलं. आता आपल्याला चिंता नाही सरकार आपलं आहे. जन्मस्थळ अडगळीत पडलं होतं. मात्र भाजपा युती सरकारने वेळोवेळी विकासनिधी उपलब्ध करीत चेहरा-मोहरा बदलला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शासकीय जयंती साजरी करण्याची विनंती केली तात्काळ त्यास मान्यता देत आज ती सर्वसमावेशक जयंती साजरी होत असल्याचे समाधान आहे. ६५ कोटी रुपयांच निधी देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी विद्यालय कार्यान्वीत होत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी चोंडीस भेट द्यावी अशी इच्छा असून अहमदनगर जिल्हयाचे नामांतर अहिल्यानगर करावे अशी मागणी केली. शेवटी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आभार मानले.
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर चोंडी तालुका जामखेङ .


stay connected