कडेकरांनी जपली माणुसकी- सौ.कलावती बाबुराव यादव यांचे दुःखद निधन; कडेकरांनी अंत्यविधी करून दिला एकतेचा संदेश

 कडेकरांनी जपली माणुसकी




सौ.कलावती बाबुराव यादव यांचे दुःखद निधन; कडेकरांनी अंत्यविधी करून दिला एकतेचा संदेश 


Vdo news पहा👆

 आष्टी/प्रतिनिधी



येथिल सौ.कलावती बाबुराव यादव वय ६० वर्ष यांचे वृद्धापकाळाने काल दि.३० मे मंगळवार रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,तीन मुली,५नातुअसा परिवार असुन एक मुलगा हा सैन्यात तर दुसरा मुलगा कामानिमित्त दुसऱ्या राज्यात आहेत.मुलांना अंत्यविधीला येण्यासाठी दोन दिवस लागणार असल्याने त्यांनी अंत्यविधी करून घ्या दोन दिवस थांबने योग्य नाही असे मुलांनी त्यांच्या घरच्यांना कळवले.परंतु आता अंत्यविधी साठी पती बाबुराव यादव वय ६५ वर्ष हे एकटेच मग अंत्यविधी कसे करणार, मुली आल्या होत्या परंतु त्यांच्या प्रथेनुसार महिला स्मशानभूमीत जात नसल्याने मुलीपण काय करणार नातू हि वयाने लहाने आहेत. निधन झाले हेच मोठे दुःख समोर असताना दुसरीकडे दुर्दैवाने अंत्यविधी कसा करावा हा प्रश्न यादव परिवारातील सदस्यांना पडला. ह्याची माहिती कडा येथील फळ विक्री करणाऱ्या युवकांना मिळाली व त्यांनी गावातील काही लोकांना हि सर्व माहिती दिली असता कडा येथिल हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येत माणुसकी दाखवत त्यांच्या अंत्यविधीसाठी पुढे आले. व हिंदू यादव या जातीधर्माच्या प्रथेनुसार त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी तयारी सुरू झाली.मयत चे पती बाबुराव यादव हे गेल्या ४० वर्षांपासून कडा येथे राहतात ते मुळचे उत्तरप्रदेश (यु पी) या राज्यातून कडा येथे आले.आधी त्यांनी कड्यात बर्फाचा व कुल्फी विक्रचा धंदा केला.आता सध्या ते फळ विक्री करतात. सौ.कलावती यादव यांच्या अंत्यविधी करण्यासाठी कडा येथिल हिंदू- मुस्लिम समाजाचे लोकांनी मिळुन त्यांचा अंत्याविधी केला असून यातून पुन्हा कडा येथिल एकता माणुसकी दिसून आली. या अंत्यविधी साठी कृषी उत्पन्न बाजार समिती कडाचे संचालक संजय(नाना) ढोबळे,उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,ग्रा.पं.सदस्य अन्सार (बंडु) सय्यद, ग्रा.पं.सदस्य आरिफ शेख यांनी अंत्यविधीची पुर्णपणे तयारी केली व रात्री १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी पत्रकार राजेंद्र जैन,गोविंद मिश्रा,सय्यद सिद्दीक,इम्रान सय्यद,शेख बिलाल,हरूण शेख,अर्जुन पवार,शौकत सय्यद,हमीद सय्यद, इब्राहिम (बाबा) पठाण, सचिन पवार,साहिल तांबोळी सह आदि हिंदू -मुस्लीम बांधव उपस्थित होते.तसेच अंतिम दशर्नासाठी गावातील महिला हि यादव यांच्या घरासमोर उपस्थित होत्या.मुलींना व नातवंडांना धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या.


एखाद्याच्या आनंदाच्या क्षणी माणुस एकवेळेस हजर नाही राहु शकला तरी चालेल परंतु दुःखाच्या व अडचणींच्या वेळेला माणसांणी मदत करण्यास हातभार लावण्यासाठी पुढे यावे ह्यालाच माणुसकी म्हणतात जे आज आपल्या कडेकरांनी दाखवून दिलं.

-संजय (नाना) ढोबळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कडा


कडा हे गाव एकतेचे प्रतिक असून आज यादव कुटुंबाच्या दुःखात व अडचणींच्या वेळेला ओळखत हिंदू -मुस्लिम बांधवांनी मिळून हिंदू यादव प्रथेनुसार तिरडीला खांदा देत पाच वेळेस विसावा घेऊन अंत्यसंस्कार करून कडेकरांनी एकता दाखवुन दिली. यादव कुटुंबाला यापुढेही काहीही अडचणी आल्या तरी आम्ही सर्वजण मिळून त्या दुर करू

- बाळासाहेब कर्डिले उपसरपंच कडा


बाबुराव यादव हे ४० वर्षांपासून कडा येथे राहतात बर्फ व कुल्फी विक्री केली. आता फळ विक्री करतात ४० वर्षात आजपर्यंत कोणाशी कसल्याच प्रकारचा वाद न करता यादव परिवार कड्यात राहत असून यापुढेही त्यांना अडचणी आल्या तरी आम्ही सर्व कडेकर त्यांच्या पाठीशी उभे राहु.

सिद्दीक सय्यद फळ विक्रेते कडा







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.