उल्हासनगर शहरात झालेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले तर बिर्ला गेट जवळ रस्त्यावर झाड कोसळले

उल्हासनगर शहरात झालेल्या  मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले तर बिर्ला गेट जवळ रस्त्यावर झाड कोसळले



 उल्हासनगर दि : - उल्हासनगर शहरात झालेल्या  मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले तर बिर्ला गेट जवळ रस्त्यावर झाड कोसळले असून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती तर दुसरीकडे सुभाष नगर परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना येजा करण्यात अडचणी ला सामना करावा लागला आहे. 

  पाऊस सुरू होण्यापूर्वी महानगर पालिका प्रशासनातर्फे शहरातील मुख्य नाले तसेच छोटे छोटे नाल्यांची सफाई केली जाते परंतु ही नाल्यांची सफाई योग्य प्रकारे केली गेली नसल्याने शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर असलेले नाले तुडुंब भरून वाहत होते तसेच या नाल्याचे पाणी ठिकठिकाणी रस्त्यावर आलेले पहावयास मिळाले. तसेच बिर्ला गेट जवळ एक नंबर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अंबिका ज्वेलर्स दुकानासमोर असलेले पिंपळाचे झाड रस्त्यावर कोसळले असून या घटनेत कोणतीही जीवित हानी किंवा कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येते. मात्र हे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. स्थानिकांनी पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांना या घटनेबद्दल कळविले आहे.

विशेष म्हणजे महानगर पालिकेने उल्हासनगर शहरातील सफाई करण्यासाठी ठेका दिला असून या ठेकेदारामार्फत कॅम्प क्रमांक एक ते तीन मधील सफाई करण्याचे काम सुरू आहे. मात्र ही सफाई योग्य प्रकारे केली गेली नसल्याचे या मुसळधार पावसाने उघड झाले आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3  येथील सुभाष नगर परिसर कालीमाता मंदिर परिसरात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे पाणी साचले होते.

   एकंदरीत  हा ठेका फक्त ठेकेदाराला खुश करण्यासाठी दिला असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पालिका आयुक्त प्रशासक अजीज शेख कोणती कारवाई करतात हे येणारा काळ सांगेल.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.