Uddav Thakre : यांचा उद्या अहमदनगर दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या शुक्रवार दिनांक 12 रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी ते येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून सर्वत्र स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र पाहायला मिळत आहे. उद्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे हे उद्या सकाळी मुंबईहून शिर्डी या ठिकाणी विमानाने येणार आहेत. त्यानंतर ते सोनई या ठिकाणी माजी खासदार यशवंतराव गडाख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार शंकरराव गडाख, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे जिल्हाप्रमुख मुजीब शेख , रावसाहेब खेवरे सहसंपर्क प्रमुख दक्षिण नगर यांसह पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर उद्धव ठाकरे हे शनिशिंगणापूर या ठिकाणी शनी मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. या ठिकाणी विधिवत पूजा झाल्यानंतर ते शिर्डी कडे रवाना होणार आहेत. शिर्डी या ठिकाणी सुद्धा काही वेळ राखीव ठेवण्यात आलेला आहे, त्यानंतर ते
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
stay connected