आष्टी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना वेतनवाढ थांबविण्याच्या नोटीसा. मनसेच्या मागणीवर कारवाई.

 आष्टी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना वेतनवाढ थांबविण्याच्या नोटीसा.
मनसेच्या मागणीवर कारवाई.



विकास साळवे आष्टी


आष्टी तालुक्यातील २०१७ ते२०२२ पर्यंत १२५ ग्रामपंचायत च्या तालुक्यातील सर्व कामाच्या जी एस टी भरण्याची चौकशी करून जी एस टी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे न भरणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दि.३/२/२०२२ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली होती. सदर पत्रावर गटविकास अधिकारी यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती परंतु गेल्या एक वर्षापासून १२५ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी त्रिसदस्यीय समितीला कसलाही प्रतिसाद न दिल्याने तसेच ज्या कंत्राटदारांच्या नावे ही कामे आहेत त्या कंत्रादारवर सुद्धा कारवाई ची मागणी केली होती परंतु ग्रामसेवकांनी त्रिसदस्यीय समितीला कसलाही प्रतिसाद न दिल्याने शेवटी गटविकास अधिकारी यांनी ०७ दिवसात खुलासा सादर न केल्यास दि.११/५/२०२३ रोजी प्रशासकीय कारवाई करून वेतनवाढ थांबविण्यात येईल अशी नोटीसा १२५ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या तक्रारीवरील कारवाईने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.