THANE | संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना निमंत्रण नसल्याच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षाची ठाण्यात निदर्शने
मुंबई ( संजय पंडीत ) -मोठा गाजावाजा करत उभारलेल्या आणि सेंट्रल विस्टा या नावाने जगाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपत्ती द्रौपदी मुर्मू यांना मोदी-शाह यांच्या भाजपाई सरकारने निमंत्रण दिले नाही. या निषेधार्थ अग्यात धर्मराज्य पक्षाच्या वतीने शनिवार, दि. २७ मे २०१३ रोजी ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर, सेंटीग पुलाखाली निषेध आंदोलन केले. धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी उपस्थित राहून जनतेला संबोधित केले.
-आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती मोदींनी सुरुवातीला स्वतःची पाठ थोपटून घेतली असली तर, त्यांच्या खोटारडेपणाचा बुरखा आता फाटलेला असून, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठीच हे आकसापोटी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले नसल्याचा आरोप राजन राजे बानी बोलताना केला.
-राष्ट्रपती केवळ देशाच्याच नव्हे तर त्या संसदेच्या अविभाज्य घटक असून, मोदी सरकारचे हे कृत्य आणि असंविधानिक असल्याची टीका राजन राजे बानी यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली. संसद भवन हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. संविधानाचे संरक्षण करताना, देशातील सर्व जाती-धर्मातील एकत्रपणे बांधून ठेवण्याचे काम या वास्तूमध्ये गेली ७५ वर्षे अविरतपणे सुरु आहे. दरम्यान या निदर्शनाला धर्मराज्य पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर व नरेंद्र विनोद राज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, धर्मराज्य आंदोलन समितीचे सदस्य संतोष तायडे, संजय दळवी आदी पदाधिकारी आणि कामगार सदस्य मोठ्याने उपस्थित होते.


stay connected