उज्वल यशाची परंपरा कायम - जनता उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 93 . 04 टक्के

 उज्वल यशाची परंपरा कायम - जनता उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 93 . 04 टक्के







धानोरा (प्रतिनिधी ) - आष्टी तालुक्यातील जनता वसतिगृह शिक्षण संस्थेच्या जनता उच्च माध्यमक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे . फेब्रुवारी - मार्च 2023 च्या इयत्ता १२वी च्या परिक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले असुन कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा एकुण निकाल 93.04 टक्के लागला आहे .

यामध्ये कला शाखेचा निकाल 85.13 टक्के लागला . यामध्ये मुलानी आशिया आदम हिने 85 . 33 गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला . जाठोत कावेरी सुनिल हिने 84 . 83 टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळविला तर शेळके पल्लवी सुखदेव हिने 83.50 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .

वाणिज्य शाखेचा निकाल 93 . 75 % लागला असून काळे आकांक्षा बाळु या विद्यार्थीनीने 85 .50 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला . थोरवे पुजा रामदास हिने 85 . 33 % गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळवला तर गव्हाणे प्रिया शिवाजी हिने 84 . 50% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .

विज्ञान शाखेचा एकुण निकाल 99 . 39 % लागला असुन यामध्ये काळे विद्या दादाभाऊ हिने 91 . 50 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला . शेळके अक्षदा धोंडीबा हिने 91. 33 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर गलांडे सिद्धी ज्ञानदेव हिने 91 . 00 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल , संस्थेचे अध्यक्ष सय्यद आब्दुलभाई , विशाल बांदल , प्राचार्य यु . आर . गव्हाणे , उपप्राचार्य एन डी चव्हाण , उपमुख्याध्यापक शिवाजी ढोबळे , पर्यवेक्षक सय्यद ए डी , व सर्व प्राध्यापक व कर्मचार्‍यानी अभिनंदन केले .







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.