पुण्यातील नाभिक समाजाच्या जेष्ठ प्राध्यापिका शितल राऊत,पवार वायरलेस कम्युनिकेशन विषयात पीएचडी ने सन्मानित....

 पुण्यातील नाभिक समाजाच्या जेष्ठ प्राध्यापिका शितल राऊत,पवार वायरलेस कम्युनिकेशन विषयात पीएचडी ने सन्मानित....






प्रतिनिधी : संजय पंडित


सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या नाभिक समाज कुटुंबातील प्राध्यापिका शितल राऊत,पवार यांना नुकतेच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पीएचडी (विद्यावाचस्पती)या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवीने सन्मानित केले आहे.

प्रा. शितल या पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमुनिकेशन विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून गेली *सोळा ( 16 years) वर्ष कार्यरत आहेत.* 

त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाला इलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकॉमिनिकेशन या विषयावर 

"डेव्हलपमेंट ऑफ लार्ज मल्टीयुजर मल्टिपल इनपुट अँड आऊटपुट - ऑर्थोगोनल फ्रिकवेंसी डिविजन मल्टीपलेक्सिंग (मिमो ऑफ डी एम) सिस्टीम टू इम्प्रुव दी परफॉर्मन्स इन फॅडींग एनव्हायरॉन्मेंट" या विषयावर प्रबंध सादर केला होता.

याकामी त्यांना त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेश जालनेकर यांचे मोलाचे सहकार्य तथा मौलिक मार्गदर्शन लाभले होते.

सवसाधरण नाभिक कुटुंबात जन्मलेल्या प्रा.शीतल यांनी प्रचंड अभ्यासातील परिश्रम,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे आकाशाला गवसणी घालणारे यश संपादन केले आहे.

त्यांच्या या दैदिप्यमान यशाचे शिक्षण क्षेत्रात कौतुक होत असून  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज्यातील सकल नाभिक समाजाला देखील या नेत्रदीपक कामगिरीचा अभिमान असून राज्यभरातील संघटनांचे पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देत आहेत. प्रा.शीतल यांच्या या यशाने समाजाची मान अभिमानाने उंचावली असून समाजाच्या शिरपेचात सन्मानाचा आणखी एक तुरा रोवल्याच्या प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत.

नाभिक समाजाच्या महिला आघाडीने देखील प्रा.शितल यांचे कौतुक केले असुन त्यांचे हे यश म्हणजे समाजातील युवतींना प्रेरणा देणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.महिला आघाडीच्या विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी प्रा. शीतल यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रा. शितल यांनी आपल्या मनोगतात पी एच डी पदवी प्राप्त केल्यामुळे विशेषकरून पती विजयकुमार पवार,वडील नरसिंग राऊत, आई जयश्री आणि सर्व कुटुंबीयांचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितले.ही पदवी प्राप्त करण्यासाठी विश्वकर्मा कॉलेजचे प्राचार्य,उपप्राचार्य,सर्व सहकारी प्राध्यापक,कर्मचारी आणि समाज बांधव यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.