माझा महाराष्ट्र
ज्ञानोबा, तुकोबांचा
एकनाथ ,गोरोबांचा
संतमहंताच्या त्यागाचा
महान माझा महाराष्ट्र🚩
जिजाऊंच्या संस्कारांचा
महाराजांच्या पराक्रमेचा
संभाजी राजेंच्या विरतेचा
महान माझा महाराष्ट्र🚩
टिळकांच्या गर्जनेचा
ज्योतीबांच्या ज्ञानाचा
सावित्रीबाईंच्या क्रांतीचा
महान माझा महाराष्ट्र🚩
भिमरायांच्या तळमळीचा
शाहु महाराजांच्या कर्तव्याचा
पुण्यश्लोकी अहिल्येचा
महान माझा महाराष्ट्र🚩
गडकिल्ल्यांच्या पराक्रमेचा
गोदावरी प्रवरा संगमेचा
कळसुबाईच्या उंच शिखरांचा
महान माझा महाराष्ट्र🚩
पोवाडा व गवळणीचा
भारुड अभंग लावणीचा
सांस्कृतिक वारसेचा
महान माझा महाराष्ट्र🚩
साडे तीन पिठांचा
अष्टविनायक महिमेचा
वेरुळ अजिंठा लेण्यांचा
महान माझा महाराष्ट्र🚩
धर्म पंथ जात त्यागुन
सगळ्यांना सामावून घेणारा
मायानगरीच्या कलेचा
महान माझा महाराष्ट्र🚩
आशा लतादीदींच्या सुरांचा
कलाकारांच्या अभिनयाचा
नटसम्राटांच्या नाट्य परंपरेचा
महान माझा महाराष्ट्र🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुप्रिया सुरेश झिंजुर्डे
नेवासा
९९६०४७०१२५
🚩जय महाराष्ट्र🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
stay connected