प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा

**************************



गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक ,सामाजिक, सांस्कृतिक विकासाच्या धडपडीत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवलेला आपला महाराष्ट्र! दगडाचा,मातीचा,डोंगर दऱ्यांचा, वीरांचा,कलावंतांचा,

बुद्धिवंतांचा,नानाविध कलाविष्कारांचा,शास्रज्ञानचा ,

समाजसुधाकरांचा आणि कसलेल्या राजकारण्यांचा आपला महाराष्ट्र!

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र या स्वतंत्र राज्याची निर्मिती केली गेली देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेकांनी मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध केला त्यामुळे मराठी बांधवांनी चिडून या लोकांना हरएक प्रकारे विरोध केला व मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी प्रामुख्याने केली.या प्रसंगी संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 105 जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसांच्या तीव्र आंदोलनामुळेच 

तत्कालीन सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना केली मराठी भाषेला राजभाषा व मुंबई ला राज्याची राजधानी म्हणून मान मिळाला.1 मे 1960 ला पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र या राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली त्यावेळी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण म्हणाले की 1 मे म्हणजे आपल्यासाठी सोन्याचा दिवस 1 मे 1960 म्हणजे मराठी भाषिकांचा स्वप्नपूर्तीचा दिवस होय.

देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने कायमच पुढाकार घेतला आहे.महाराष्ट्राने आपली ऐतिहासिक,सामाजिक,

सांस्कृतिक कार्य कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली होती.महाराष्ट्राच्या धार्मिक व सामाजिक सुधारणांचा चढता आलेख तर उल्लेखनिय असा आहे.महाराष्ट्र ही संतांच्या,वीर 

पुरुषांच्या विचारांनी पावन झालेली भूमी आहे  छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज सारखे राजे याच मातीत जन्मले व वाढले त्यांनी सर्व परकीय आक्रमनापासून महाराष्ट्र चीच नव्हे तर देशाची सुरक्षा केली जगाला सर्वधर्म

समभाव व विश्वबंधुत्वची शिकवण दिली त्यांच्या विचारा

वरच आज महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी किती तरी महाराष्ट्रतील आपल्या वीरांनी प्राणांचे बलिदान दिले आहे त्यात टिळक,आगरकर, सावरकर,चाफेकर बंधू या व अशा अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले होते.

संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ,नामदेव,जनाई, चोखोबा,निळोबा,जगनाडे महाराज, रोहिदास,कबीर,नरहरी सोनार, कान्होपात्रा, सावता माळी, गोरोबा काका वा अशा अनेक जातीय संत मांदियाळी ने आपल्या  कार्याने संपूर्ण मानव जातीच्या मनाला नवचेतना,

ऊर्जा,संस्कार दिला.फुले,शाहू,

आंबेडकर, गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे वा इतर अनेक समाजसुधारक प्रबोधनकारांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राची शान देशात वाढविली आहे.महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला,शिक्षण,क्रीडा,

सांस्कृतिक, नाट्य,चित्रपट, सहकार,कृषी,उद्योग,संगणक,

विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहे.

स्त्री कर्तृत्व गाजवणाऱ्या व स्त्री पुरुष समानता आणणाऱ्या जिजाऊ,रमाई,सावित्री,अहिल्या वा इतर अनेक कर्तृत्ववान महिला याच मातीत घडल्या आहेत.





प्रत्येक प्रदेशाला भूगोल असतो पण महाराष्ट्र च्या या भूमीला स्वाभिमानाचा,कर्तृत्वाचा इतिहास आहे प्राचीन सांस्कृतिक ठेवा असलेल्या वेरूळ,अजिंठा पासून सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील व समुद्रातील गड कोट किल्ले आज ही महाराष्ट्राच्या खऱ्या श्रीमंत इतिहासाची साक्ष देतात कोकणातील निसर्ग व विस्तीर्ण असा समुद्र किनारा कायमच सगळ्या जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे महाराष्ट्रात एकूण पर्यटन साठी थंड हवेची  सतरा ठिकाणे आहेत व सर्वाधिक रस्ते  

सडक मार्ग ही महराष्ट्रातच जास्त आहेत.भारतातील पहिली रेल्वे सुद्धा महाराष्ट्रातूनच धावलेली आहे भारतात सगळ्यात श्रीमंत असलेल्या आपल्या महाराष्ट्रत लोक वाहतुकीसाठी अल्प दारात असलेले एसटी चे जाळे सगळीकडे पसरलेले आहे.

क्षेत्रफळच्या दृष्टीने महाराष्ट्रचा देशात  तिसरा क्रमांक येतो.

सह्याद्रीच्या पर्वत रांगामधून 

भीमा,वरदा, कृष्णा,कोयना,

गोदावरी वा अशा अनेक नद्या उपनद्या महाराष्ट्रत वाहतात,मोठ्या धरणा बरोबरच उद्योग क्षेत्रात ही महाराष्ट्रने मोठी आघाडी घेतलेली आहे म्हणूनच बाहेरच्या अविकसित राज्यातील अनेक लोक मजूर म्हणून कामासाठी इकडे येतात.देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेअर बाजार ही मुंबई येथेच आहे याच मुंबई ला मायानगरी ही म्हंटल जाते इथे चित्रपट निर्मिती देशात सगळ्यात जास्त प्रमाणत होते या मुंबईनेच अनेक कलाकाराना प्रसिद्धी च्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे भारतरत्न लता मंगेशकर पासून ते अनेक जागतिक दर्जाचे कलाकार,गायक या महाराष्ट्रात घडले. क्रिकेट या खेळात भारतरत्न पुरस्कार प्राप्त केलेल्या सचिन तेंडुलकर पासून अनेक क्रिकेट वीर या महाराष्ट्राने देशाच्या टीम ला दिले कब्बडी,कुस्ती वा इतर अनेक खेळ प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूचा दबदबा सगळ्या देशात आज ही कायम आहे.आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्र व पत्रकारांचे खूप मोठे योगदान व त्याचे काम आजतागायत कायम चालू आहे .महाराष्ट्रातील

 लोक भावनिक,श्रद्धाळू,

धार्मिक परंपरा मानणारे व त्या 

परंपरांचा उत्सव साजरे करणारे आहेत जागतिक आश्चर्य असलेली 

विठ्ठल भक्तांची लाखो लोकांची निस्वार्थी पायी वारी जगाच्या पाठीवर आपल्याला कोठे ही पाहायला मिळणार नाही,अनेक प्रसिध्द देव,देवी,शंकराचे मंदिर महाराष्ट्रत आहेत व त्या सर्व देवतांची भक्ती लोक मोठ्या श्रद्धेने करतात गणेश उत्सव, दहीहंडी,शिमगा,नवरात्र,दिवाळी,ईद,नाताळ वा इतर अनेक सण उत्सव आपआपल्या परंपरेनुसार साजरे करतात,नांदेड गुरुद्वारा तर शीख समुदाय चे देशातील प्रमुख देवस्थान इथे आहे.

अनेक पोवाडे,नाटक,दशावतार, भजन,कीर्तन च्या माध्यमातून धर्म  प्रबोधनाचे मोठे काम केले जाते.

येथील अनेक लोक शाहीर व तमाशा कलावंतांनी आपली कला सादर करून मनोरंजन बरोबरच समाज जागृती ही केली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर या कलाकारांनी आपल्या कलांच्या माध्यमातून खूप लोक जागृती करून आंदोलनाला मोठी धार प्राप्त करून दिली होती.भारताच्या लष्करात तर महाराष्ट्राच्या जवानांचे खूप मोठे योगदान आहे प्रसंगी देशासाठी शाहिद होऊन वीरगती  त्यांना प्राप्त झालेली आहे लष्करातील मराठा लाईट इन्फ्रटी व महार रेजिमेंट या सैन्य दलातील प्रमुख तुकड्या ठरल्या आहेत या दोनही तुकड्यात महाराष्ट्रातील जवान मोठ्या प्रमाणात देशासाठी सेवा बजावत आहेत.

आपल्या या सर्व पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवून आपण पुढे मार्गक्रमण करत आहोत यासाठी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा आपल्याला कायमच गर्व आहे.

पण तरी ही काही प्रश्न आज अनुत्तरीत आहेत,खरच महाराष्ट्र विकसित झालाय का?विकासाच्या नेमक्या व्याख्या तरी काय असतात?गेल्या 62 वर्षात महाराष्ट्र कुठल्या दिशेने जात आहे?हे तरी आपल्या सर्वांच्या लक्षात यायला हवे,62 वर्षात महाराष्ट्र स्वतंत्र राज्य होऊन सुद्धा

मूलभूत प्रश्न आज ही तसेच आहेत,वीज भारनियमन आहे,भ्रष्ट्राचार तर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे,कृषी क्षेत्राची दयनीय अवस्था आहे रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत,स्त्री भ्रूण हत्या,बलात्कार,जातीयवादी घटना आज ही घडून येत आहेत,

राजकारण्यांचा सत्तेसाठी काही ही करण्याची न शोभणारी वृत्ती दिसुन येत आहे बेरोजगारी चे मोठे संकट दिवसेंदिवस जास्त मोठे होत चालले आहे, या वा अशा अनेक समाज विघातक गोष्टी समोर उभ्या आहेत या सर्व समस्यांचे चिंतन करून त्यावर उपाय योजना करण्याची गरज शासन,प्रशासन बरोबरच आपल्या सर्वांची आहे.

ज्या वेळी देशावर संकट आले त्यावेळी देशाला दिशा देण्याचे काम कायमच आपल्या महाराष्ट्राने केले आहे.खऱ्या अर्थाने राष्ट्राचे राष्ट्रपन टिकवून ठेवणारा हा आपला महाराष्ट्र आहे.आपल्या सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

" बहू असोत सुंदर संपन्न की महा,

प्रीय आमुचा एक महाराष्ट्र देश हा...!!"


लेखक-
प्रा.महेश कुंडलिक चौरे,
आष्टी.
मो.9423471324





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.