प्रेम म्हणजे नेमके काय असते

 प्रेम म्हणजे नेमके काय असते

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे ,४४

    


*प्रेम म्हणजे प्रेम असते*,

*तुमचे आमचे सेम असते*..

         माणूस हा समाजशील प्राणी आहे.तो एकटा राहूच शकत नाही..जगण्याचा प्रश्न तर कोसो दूर.आपले शरीर मन व आत्मा यांनी बनलेले आहे.मनाचे मनाशी मिलन कधी होते...हे कोणीच स्पष्ट सांगू शकत नाही.कधी कोणाला कोण आवडेल काहीच सांगता येत नाही.निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे तरी नेमके काय.तेथे प्रत्यक्ष भेटण्याचा संबंध येतच नाही.रूप,रंग, पैसा,नोकरी,घरदार,श्रीमंती,अंध,अपंग,बुटका,जाडा,बारीक,बहिरा....अजून काय काय यात त्याचा काहीच संबंध येत नाही.

          प्रेम ही भावना अतिशय नाजूक आहे.तिचा मन सोडून इतर कोणत्याही गोष्टींशी काडीमात्राचांही संबंध नाही.प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांचा बनलेला असतो.तसेच आपले शरीर ही नाना पेशींनी बनलेले आहे.त्यात मन व आत्मा विराजमान आहे म्हणून तो जिवंत आहे.आत्मा निघून जाईल तेव्हा त्याला काही किंमत राहत नाही.ते पार्थिव बनते..त्याला नष्ट करणे म्हणजे पुरणे, जाळणे हे अंतिम सत्य.जो पर्यंत आत्मा आहे तो पर्यंत मन ही जिवंत असते. मन हे चंचल पाखरू आहे.ते निरपेक्षपणे जेव्हा कोणाला आपले मनातून मानते तेव्हा ते उच्चतम पातळीवर जावून पोहचलेले असते.कधी त्या व्यक्तीला आमने सामने पाहण्याची बिल्कुल आवश्यकता नसते.कोणाच्या शब्दांवर,कोणाच्या भाषेवर,कोणाच्या गाण्यावर,कोणाच्या बोलण्यावर,कोणाच्या हसण्यावर,कोणाच्या रागावर,कोणाच्या लिखाणावर,कोणाच्या स्पष्ट बोलण्यावर कधी कोणाला प्रेम होईल सांगता येत नाही.प्रेम हे कधीच बळजबरी होवू शकत नाही.ते लादून देणे किंवा घेणे खूप चुकीचे आहे खरं तर ते प्रेमच नसते.प्रेम हे नकळत घडते.हवचे अस्तित्व जसे आपल्याभोवती चौफेर आहे,तसेच प्रेमाचे ही.हवे शिवाय जगू शकतो का? नाही ना? मग,प्रेमाशिवाय तरी शक्य आहे का? प्रेम म्हणजे जे आजकाल दाखवले जाते ते बिल्कुल नाही.जीवनात प्रत्येक जण कशांकशावर प्रेम करत असते.प्रेम करण्यासाठी मनुष्य च हवा असेही नाही ना? प्रेम हे पुस्तकावर होवू शकते,भाषेवर होवू शकते,प्रेम हे गाण्यावर,सुरावर,अर्थावर, लयीवर, प्राण्यांवर,पक्ष्यांवर,आपल्या कामावर ....होवू शकते.

         प्रेमाशिवाय जीवन अधुरे आहे.सुख दुःखाला हळुवार जपते ते प्रेम.कृष्णवेडी राधा आठवा.समजेल...प्रेम म्हणजे काय असते....मिरा आठवा...अहो प्रेमाशिवाय प्रत्येक जीव अपूर्ण.छंद,आवड का जोपासतो..आपण हे प्रेम जिवंत राहण्यासाठीच ना...खऱ्या अर्थी जीवन जगणे म्हणजे काय?

      प्रेम हे प्रेम असते.ते कधी कोणावर होईल काहीच सांगू शकत नाही.ते मनाचे मनाशी मिलन असते.मन जुळली की झाले.त्याला प्रत्यक्ष भेटण्याची ,पाहण्याची गरज नसते.ही भावनाच इतकी कोमल आहे की ,ती शब्दात व्यक्त करणे महा कठीण.प्रेम हे फक्त जाणून घेणे महत्त्वाचे असते.त्यात मनाला प्रथम उच्च स्थान असते.बंधने असेल त्याला प्रेम म्हणताच येत नाही.

     आजकाल प्रेमाच्या व्याख्या फार वेगळ्या झाल्या आहेत.त्याची व्याख्या ही होवूच शकत नाही..पण काही प्रेम वीरांनी तिला त्यात बंदिस्त केले..तर काहींनी रुपावर,कोणी पैशावर ही प्रेम करू लागले  आहे.

      अरेंज मॅरेज मध्ये ही खूप लग्न फसतात... लव मॅरेज मध्ये ही तसे घडते.प्रेम म्हणजे लग्न च करणे असे ही नाही ना.त्या व्यक्तीच्या स्वभाव वर,गुणांवर,सवयींवर,शब्दांवर,भाषेवर .... हे प्रेम होत असते.

     प्रेम ही निर्मळ,कोमल भावना आहे.ती निस्वार्थ असावी.मनाचा मनाशी संवाद घडला की जी ऊर्जा निर्माण होते ती अद्वितीय असते.प्रेम हे पाहून कधीच होत नसते...ते नकळत होते.


सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे ,४४







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.