बीग ब्रेकिंग! कारवाया करून भीती दाखवू नका ! सुप्रिम कोर्टाने ईडीला झापले !

 बीग ब्रेकिंग! कारवाया करून भीती दाखवू नका ! सुप्रिम कोर्टाने ईडीला झापले !



आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप करत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये धडक कारवाई करणाऱ्या ईडीवर आता सुप्रीम कोर्टाने शाब्दिक कारवाई केली आहे. छत्तीसगडमध्ये मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर कारवाई करण्याची हालचाल सुरू केली होती. त्यानंतर ईडीकडून उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना धमक्या येत असल्याचा आरोप करत छत्तीसगड सरकारने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीवेळी, कारवाया करून भीतीचे वातावरण निर्माण करू नका, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. दिल्लीनंतर छत्तीसगडमध्येही तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीने चौकशी सुरू केली होती. त्यानंतर ईडीकडून अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई करण्यात आली होती.





 दरम्यान, छत्तीसगड सरकारने ईडीच्या कारवायांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ईडीचे अधिकारी राजकीय नेत्यांना धमक्या देत असून मुख्यमंत्री बघेल यांना अटक करण्याची तयारी ईडीकडून सुरू असल्याचे छत्तीसगड सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले होते. याशिवाय छत्तीसगडमध्ये कायदेशीररित्याच कारवाया होत असल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांकडून करण्यात आला होता. ईडीने कारवाई केल्यास एखाद्या प्रामाणिक कामाबद्दलही संशय निर्माण होतो, त्यामुळे ईडीसारख्या तपास यंत्रणांनी छत्तीसगडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे म्हणत कोर्टाने ईडीला झापले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.