आष्टी तालुक्यात चार बिबट्यांचे वास्तव्य - वनविभागाचा दावा .

आष्टी तालुक्यात चार बिबट्यांचे वास्तव्य - वनविभागाचा दावा .



आष्टी (प्रतिनिधी ) -  बिबट्या दिसल्यावर अनेकांची बोलती बंद होते. एवढेच काय तर पाचावर धारण बसल्याशिवाय राहत नाही. बिबट्याची भयावह धास्ती तालुक्यातील नागरिकांना आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी तिघांचा बळी घेतल्याने बिबट्याची दहशत आहे. पण सध्या वास्तवास असलेले बिबटे नरभक्षक नसल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात येत आहे.

आष्टी तालुक्यातील वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हिवरा , देवळाली, मातकुळी, कारखेल बुद्रुक, बीडसांगवी, महादेव दरा, हातोला, बावी, पिंपरीघाटा, सु. देवळा, कापशी यासह अन्य डोंगरात जवळपास चार बिबटे वास्तव करतात. जनावरे चारणार्‍या व अंधारात रस्त्यावरुन ये-जा करत असलेल्या लोकांच्या नजरेस हे बिबटे पडतात. नरभक्षक बिबट्याची दहशत संपल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. आता मात्र पुन्हा बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकरी धास्तावला आहे. मात्र हे बिबट नरभक्षक नसल्याचे वनविभाग सांगत आहे . तरीही शेतकऱ्यानी सतर्क राहणे गरजेचे आहे .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.