वेलतुरी गावातील शिवम ससाणे बनला गावातील पहिला राजपत्रित अधिकारी.

वेलतुरी गावातील शिवम ससाणे बनला गावातील पहिला राजपत्रित अधिकारी.




रोहिदास ससाणे हे वेलतूरी गावातील माजी सरपंच असून धार्मिक क्षेत्रामध्ये नियमित भजन च्या माध्यमातून त्यांचा सहभाग असतो.त्यांचा मोठा मुलगा अमोल रोहिदास ससाणे हा ' सुझलॉन एनर्जी लिमिटेड' या कंपनी मध्ये इल्क्ट्रिकल इंजिनीयर  म्हणून कार्यरत आहे.व लहान मुलगा शिवम हा आहे. शिवम चे प्राथमिक शिक्षण जी.प प्राथमिक शाळा वेलतुरी याच गावात झाले आहे,प्राथमिक शाळेपासून शिवम ने आपले विविध कौशल्याचा वापर करून विविध पारितोषिके मिळवली आहेत.

त्याचप्रमाणे गंगादेवी विद्यालय गंगादेवी येथे शिवमने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. इयत्ता दहावी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे पॉलटेक्निक शिक्षण पूर्ण केले व रायसोनी कॉलेज पुणे येथे डीग्री ही पदवी घेतली. याच बरोबर क्रिकेट पाहणे व खेळणे तसेच नियमित अवांतर वाचन करणे हे त्याने छंद जोपासले आहेत,आपण एका खेडेगावात असून आपल्याला कुठल्याही प्रकारे शिकवणी नाही असा सुद्धा हट्ट कधी शीवमने आपल्या वडिलांना केला नाही.कारण शिवम हा मुळातच हुशार असणारा विद्यार्थी असून प्रत्येक शाळेमध्ये तसेच विद्यालयामध्ये शिवम नेहमीच अव्वल क्रमांक पटकवत असे.

   वेलतुरी सारख्या खेडेगावात राहून शिवमचे वडील रोहिदास शिवराम ससाणे हे एक किराणा दुकान चालवत होते.परंतु वेळात वेळ काढून ते आपल्या मुलांचे शिक्षण हे चांगलेच असावे असा त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा.शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि ते कसे उपब्धत करून द्यावे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवम चे वडील आहेत.म्हणून खास या शिवम च्य या यशामागे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.शिवम विषयी विशेष सांगायचे झाल्यास नुकतीच ओ.एन.जी. सी मार्फत झालेली ज्युनियर इंजिनिअर परिक्षेत शिवम हा विशेष गुण प्राप्त करणारा सुद्धा विद्यार्थी ठरला गेलेला आहे. जेव्हा शिवम या परिक्षेत उत्तीर्ण झाला तेंव्हा त्याच परिक्षेत उत्तीर्ण झालेला एका मुलाचा शिवमला कॉल आला की सर तुम्ही जर ओ.एन.जी.सी मध्ये जॉईन नाही झालात तर ही संधी मला मिळू शकेल,शिवम ने यावर विचार करून चक्क ही संधी त्याने दुसऱ्या मुलाला देण्याचा निर्णय घेतला व त्याला या गोष्टीला त्याच्या कुटुंबाने सुद्धा पाठिंबा दिला. या उदार कार्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.गावातील प्रथम नागरिक सरपंच श्री.नवनाथ चांगदेव गव्हाणे,उपसरपंच सौ.सूनिताताई शिवाजी गव्हाणे,ग्रा. पंचायत सदस्य श्री. नवनाथ रंगनाथ गव्हाणे, श्री.ज्ञानेश्वर म्हातरदेव गव्हाणे,श्री बबन झिंगा पवार, श्री.शंकर अण्णा गव्हाणे,श्री.मच्छिंद्र घोडके यांनी अभिनंदन केले.

 तसेच सोसायटी सदस्य श्री.अजीनाथ गव्हाणे(पाटील)व सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.भानुदास गायकवाड सर यांनी शिवमचा सत्कार करून त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

              

  - प्राध्यापक- प्रशांत गायकवाड(वेलतुरी)









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.