गौतमी पाटील चा डान्स बघतान कोसळले छत
आपल्या नृत्यामुळं आणि कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ किवा घटना घडणे हे नित्याचच आहे .त्यामुळे गौतमी पाटील कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे. तिच्या कार्यक्रमदरम्यान मोठ्या प्रणामात प्रेक्षकांची गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू असतानाच समोर छतावर उभी असलेली काही लोक छतासह खाली कोसळली. व एकच गोंधळ उडला .
वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील यांची लोकप्रियता पाहता कार्यक्रम बघण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अशातच जागा कमी पडल्याने काही नागरिक परिसरातील दुकानांवर कार्यक्रम पाहण्यासाठी चढले होते. तर कार्यक्रमादरम्यान काही लोक हे एका पत्राच्या शेडच्या दुकानावर बसून कार्यक्रम बघत होते. अशातच हे पत्र्याचे शेड लोकांसह खाली कोसळले.
stay connected