खुष खबर ! राज्यात एक जुनला येतोय मान्सुन
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 1 जून 2023 रोजी मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यांनी सांगितले की, 21 आणि 22 मे च्या सुमारास अंदमान मध्ये मान्सून दाखल होईल.
यानंतर मानसून साठी पोषक हवामान तयार होईल आणि 31 मे नंतर मान्सूनचा प्रवेश हा महाराष्ट्रात होणे शक्य होईल. एक जूनला राज्यात मान्सूनचा प्रवेश होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. अर्थातच यंदा मानसून जवळपास एक आठवडा लवकर दाखल होण्याची शक्यता पंजाब डख यांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, दरवर्षी मान्सूनचे आगमन सात जून नंतर महाराष्ट्रात होते. राज्यात सर्वप्रथम तळ कोकणात मान्सून दाखल होतो यानंतर तो मुंबईच्या दिशेने रवाना होतो मग मुंबई येथून हा मान्सून संपूर्ण राज्य व्यापत असतो. यंदा मात्र डख यांनी मान्सूनचे आगमन एक आठवडा लवकर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. 1 जूनला राज्यात मान्सूनचे आगमन होईल आणि मान्सून आगमनानंतर जवळपास तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी आतापासूनच करावी लागणार आहे. पिक पेरणीसाठी रान तयार करावे लागणार आहे. आवश्यक खतांचा तसेच बियाण्यांची उपलब्धता करून ठेवावी लागणार आहे तसेच शेतकऱ्यांना आता भांडवल देखील उभारावे लागणार आहे.
खरं पाहता भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अर्थातच मान्सून वर आधारित आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली जाते. दरम्यान यंदा मान्सून आगमन एक जूनलाच होणार असल्याचा दावा डख यांनी केला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्टपणे पहावयास मिळत आहेत.
यासोबतच, डख यांनी 21 मे नंतर राज्यात हवामानात मोठा बदल होणार असल्याची माहिती दिली आहे आणि राज्यातील बहुतांशी भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
21, 22 आणि 23 जून पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. यानंतर पुढे मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होईल आणि एक जून नंतर राज्यात मान्सूनचा पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं आहे.
stay connected