चारचाकी व मोटारसायकल अपघात: एक ठार.
केज (प्रतिनिधी)
अंबाजोगाई रोडवर भारत पेट्रोल पंपाच्या समोर केज केशव जिनीगंच्या बाजुस बजाज एम ए टी व मारूती आल्टो या दोन्ही गाड्या अंबाजोगाई कडून केजच्या दिशेने येत होत्या त्याच वेळेस मोटारसायकल स्वाराने हात दाखवून पेट्रोल भरण्या साठी गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली पण माघून येणाऱ्या भरधाव येणाऱ्या चारचाकीस गाडी कंट्रोल झाली नाही व मागुन जोरदार धडक बसली यात बजाज एम ए टी दुचाकी वरुण महादेव हनुमंत पंचाळ वय वर्ष. 60 रा ढाकेफळ यांना मार लागला व गंभीर दुखापत झाली त्यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे घेऊन गेले असता मृत घोषित केले. मारुती सुझुकी कंपनीची कार असून क्र.MH25 A 3196 हा नंबर आहे.
हा अपघात मंगळवार दि . १६ रोजी दुपारी १२ वा . झाला .महादेव हनुमंत पांचाळ हे केज तालुक्यातील ढाकेफळ येथील रहिवाशी असून सुतार काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.त्यांची परिस्थितीत अत्यंत हालाकीची आहे.
stay connected