श्री संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ लवकर स्थापन करून अध्यक्षांच्या नियुक्ती सह निर्धारित निधीत वाढ करा...

 राष्ट्रीय जनसेवा पक्षाची नाभिक समाजासाठी सरकारकडे मागणी..



श्री संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ लवकर स्थापन करून अध्यक्षांच्या नियुक्ती सह निर्धारित निधीत वाढ करा...


दि.१६ मुंबई : राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित केल्याप्रमाणे श्री संत सेनाजी केस शिल्पी महामंडळ तात्काळ स्थापित करून त्यावर नाभिक समाजातील अध्यक्ष नियुक्त करावा अशा आशयाचे निवेदन आज राज्य सरकारला देण्यात आले.

राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पंडित यांनी हे निवेदन राज्यातील सकल नाभिक समाजाच्या वतीने राज्याचे बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांना देण्यात आले.

यावेळी पक्षाध्यक्ष महावीरजी गाडेकर,संपर्क प्रमुख गजानन राऊत उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सदर निवेदन देण्यात आले असून अधिवेशनात केलेली ५० कोटी रुपयांची तरतूद अतिशय तुटपुंजी असून राज्यातील नाभिक समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत सदर निधीत भरीव वाढ करणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वाढती महागाई,ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी,सलून व्यवसायातील जीवघेणी स्पर्धा,कार्पोरेट कंपन्या आणि इतर समाजाच्या लोकांचे सलून व्यवसायातील अतिक्रमण आदी समस्यांना रोज तोड देताना सलून व्यवसायिकांच्या नाकी दम येतो.

कोरोणा महामारीने सर्वात जास्त नुकसान याच व्यवसायाचे झाले आहे.

हा पारंपरिक सेवा देणारा व्यवसाय नव्या उमेदीने पुन्हा उभा रहावा आणि हा व्यवसाय करणारा खेड्यापाड्यातील नाभिक समाज विकासाच्या प्रवाहात यावा म्हणून  सलून व्यवसायिकांना शासकीय आर्थिक सहाय्याची अत्यंत गरज आहे.

सलून व्यवसाय हा नाभिक समाजाचं कणा असून

सलून व्यवसाय टिकला तरच राज्यातील नाभिक समाज टिकणार आहे.

आणि म्हणूनच राज्य सरकारने लवकरात लवकर घोषणेप्रमाने श्री संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ स्थापित करून अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी महत्वपूर्ण मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच राज्यातील नाभिक समाजाची लोकसंख्या पाहता आणि वाढलेला सलून व्यवसाय लक्षात घेता सरकारने या महामंडळाच्या निधीत अधिक भरीव वाढ करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.