आम आदमी पार्टीची बीड जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न

 आम आदमी पार्टीची बीड जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न

बीड जिल्ह्यामध्ये स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकांना युवकांना व युवतींना राजकारणामध्ये आम आदमी पार्टी संधी देत आहे - माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

_________________________






बीड_  बीड नाशिक येथे महाराष्ट्राचे सहप्रभारी मा. गोपाल इटालिया यांच्या उपस्थितीत मा. रंगा राजुरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र कार्यकारणी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यकारणीच्या बैठका घेण्याचे ठरले होते त्याचप्रमाणे बीडमध्ये देखील जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले ही बैठक मा. माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मा. प्रा. ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री यांच्या प्रस्तावाने बैठकीचे आयोजन करण्यात आले हि  बैठक नाशिक येथे झालेल्या बैठकीच्या निर्णयाप्रमाणे सर्व  जिल्हा कार्यकारणी सोबत बैठक करण्यात आली या बैठकीमध्ये येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन जिल्हा कमिटी बैठका घेईल व तालुका कमिट्या करण्याचं ध्येय पुर्ण करण्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला  येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातील सर्व निवडणुका या ताकदीनिशी लढणार आहे याच अनुषंगाने संपूर्ण तालुकाध्यक्ष तालुका कमिट्या आम आदमी पार्टीची जिल्हा कार्यकारणी त्या ठिकाणी जाऊन घोषित करणार आहे जर आम आदमी पार्टी सोबत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवकांना सामान्य नागरिकांना व महिलांना आम आदमी पार्टी राजकारणामध्ये संधी देत आहे याच संधीचा फायदा घ्यावा असे आव्हान आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केला आहे लवकरच तालुका निहाय बैठकांचे आयोजन होणार आहे सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य राहील या जिल्हा बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीसाठी संपूर्ण जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे मा. संजय खाडे जिल्हा उपाध्यक्ष संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर जी राऊत मा.कैलास चंद्रजी पालीवाल सहसचिव साळवे राहुल मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर सोशल मीडिया प्रमुख सुरेखा डोंगरदिवे महिला आघाडी अध्यक्ष भीमराव कुठे तालुका अध्यक्ष अंबादास सोनवणे अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष माननीय अमोल शिंदे ऑटो आघाडी अध्यक्ष इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.