देशसेवेतुन मानसिक आनंद,सन्मान व सामाजिक सेवेची प्रेरणा मिळते -ऑडनरी लेफ्टनंट शरदचंद्र तांदळे
देवळाली (वार्ताहार)
आष्टीतालुक्यातील देवळाली येथिल शरदचंद्र आदिनाथ तांदळे हे भारतीय सैन्य दलातील वैद्यकिय क्षेत्रात ऑडनरी लेफ्टनंट या पदावर २८ वर्षे सेवा पूर्ण केली असून त्यांचा सेवापुर्ती सोहळा देवळाली ग्रामस्थांनी भव्य दिव्य गावातुन वाजतगाजत मिरणुक काढून मोठ्या उत्साहात संपन्न केला या वेळी देवळाली व परिसरातील माजी सैनिकासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवापुर्ती सोहळ्या दरम्यान ऑडनरी लेफ्टनंट शरदचंद्र तांदळे बोलत असताना म्हणाले भारतीय सैन्य दलात २८वर्षे सेवा पुर्ण करुन चैतन्यस्वामी व आईवडीलांच्या आशिर्वादाने सुखरूप सेवानिवृत्त झालो.तरुणांनी मोठ्या संख्येने सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी सैन्यात नोकरी करण्यात जो सन्मान आहे तो इतर ठिकाणी दिसून येत नाही,सैनिकांच्या कुटूंबात काही त्रासा बरोबरच समाधानही फार मोठे असते माझा जो नागरी सन्मान देवळाली ग्रामस्थांनी केला त्यांचा मी कायम ऋणी राहील.
या कार्यक्रमात देवळाली परिसरातील सर्व सेवानिवृत्त सैनिकासह सेवा निवृत्त पोलिसांचा सत्कार करण्यात आला त्या मध्ये कॅप्टन नारायण तळेकर,पी एस आय अमरसिंह बिसेन,नायक रावसाहेब नागरे,नायक पोपट नागरे,नायक राजेंद्र कांबळे,अकोलकर साहेब,आव्हाड साहेब,कुतरवडे साहेब,साळवे साहेब,शेकडे साहेब,चौधार साहेब,खेडकर साहेब आदिंचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास ह.भ.प.कोल्हे बाबा,ह.भ.प.दिनकरराव तांदळे,सरपंच पोपटराव शेकडे,माजी सरपंच नारायणराव जवणे,हरिभाऊ तांदळे,बबनराव तळेकर,शैलेश मोहीते,मुरलीधर शेकडे मुकादम,हनुमंत तळेकर,डॉ.कल्याणराव पवार,दशरथ राऊत,जे.एस तांदळे सर,देवीदास खाडे सर,दत्तोबा तांदळे,गजानन कुलकर्णी, पत्रकार शरद तळेकर,किशोर तळेकर,रमेश डोके,अशोक तांदळे,निलेश पवार,गणेश खाडे,दिलीप तांदळे,विजय आमले,दादा खाडे,बाळासाहेब राजगुरू,सुनिल नामदेव खाडे,दत्तोबा नवले,आदिसह आई वडील पत्नी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कॅप्टन नारायण तळेकर,अमरसिंह बिसेन,ह.भ.प.दिनकरराव तांदळे,देविदास खाडे सर,कु.समिक्षा तांदळेसह आदींनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल खाडे सर यांनी केले तर आभार अशोक तांदळे सर यांनी मानले.
stay connected