Anisha Global School: सीबीएसई शंभर टक्के निकाल
सुजल भंडारी ९६% गुण मिळवून पटकावले अव्वल स्थान
आष्टी (प्रतिनिधी)
श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थान संचलित अनिषा ग्लोबल स्कूलच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा इ.१० वी चा शंभर टक्के निकाल लागला. सुजल भंडारी याने ९६% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या निकालात समर्थ औंदकर याने ९४.८०%, कृष्णा चटाले याने ९४.४०%, प्रतीक्षा काळदाते हिने ९१.८०% व अक्षद मुळीक याने ९१.२०% पटकावले. सुजल भंडारी याला गणित विषयात ९९% गुण तर सोशल सायन्स विषयात कृष्णा चटाले व सुयश खराडे याला ९९% गुण प्राप्त झाले. विद्यार्थ्यांना जैस जोसेफ, अविनाश राऊत, तपन गौडा, बाबूलाल परदेशी,रमण काकडे यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल देवस्थानचे अध्यक्ष आ.सुरेश धस, शाळेच्या मार्गदर्शिका सौ.प्राजक्ताताई धस,देवस्थानचे सचिव संजय मुळे,कोषाध्यक्ष विनय पटधारिया, विश्वस्त लक्ष्मण रेडेकर,देवस्थानचे सर्व विश्वस्त,शाळेचे उप-प्राचार्य अविनाश राऊत, तपन गौडा व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनिषा ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना NEET/IIT Foundation, MPSC/UPSC साठी मार्गदर्शन,लँग्वेज क्लब,इको क्लब, स्पोर्ट्स क्लब याचे मार्गदर्शन दिले जाते. अभ्यासाबरोबर विविध प्रकारच्या उपक्रम घेतले जातात. त्यामुळेच संपूर्ण तालुक्यातून अनिषा ग्लोबल स्कूलला पसंती मिळत आहे.
stay connected