माता भगिनीच्या डोक्यावरील हंडा उतरवणे हेच प्रथम कर्तव्य - सरपंच करांडे....

 माता भगिनीच्या डोक्यावरील हंडा उतरवणे हेच प्रथम कर्तव्य - सरपंच करांडे....



विकास साळवे / बीडसांगवी - आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी ग्रामीण  भाग दुष्काळग्रस्त असुन आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाची योजना सुरु करण्यात आली . चार कोटीची ही योजना असुन घरोघरी व वस्तीवर नळ योजना चालु होणार आहे .

 माता भगिनीची पाण्यासाठीची पायपीट थांबवणे  हे प्रथम कर्तव्य असुन येणाऱ्या काळात बीड सांगवी ग्रामपंचायत गावाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे जल जीवन मिशन अंतर्गत बीड सांगवी गावांमध्ये प्रत्येकाला घरामध्ये स्वच्छ पाणी मिळावे याकरता सदर योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे काम चालू झाले चालू झाले आहे सध्या काम प्रगती पथावर चालू आहे तरी ग्रामस्थ व पदाधिकारी काम करून घ्यावे असे प्रतिपादन सरपंच शितलताई नंदकिशोर करांडे यांनी केले आहे जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यांतील बीड सांगवी येथील चार कोटी चे काम प्रगती पथावर चालू आहे हर घर पाणी योजना आहे 15 व्या वितआयोगातून पाण्याची टाकी ते परमेश्वर माळी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिट करण चे काम सुरु केले आहे . यावेळी नंदकिशोर करांडे संपत ढोबळे सुभाष तात्या गणगे बबनराव करांडे महादेव चव्हाण विकास तात्या साळवे भाऊसाहेब नरवडे सदाशिव गणगे सोमनाथ घुले बापूराव करांडे जालीदर करांडे महादेव घुले दादासाहेब साळवे संजय बावणे हिम्मत चव्हाण नामदेव नरोडे तुकाराम करांडे निलेश देवा हे उपस्थित होते . पाईपलाईनचे काम होत असल्याने पाण्याचा प्रश्न मिटेल जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटीबद्ध असून जल जीवन मिशन अंतर्गत गावाला शुद्ध पाणी मिळणार आहे असे मत मत युवा नेते संपत ढोबळे यांनी व्यक्त केले आहे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.