सोलापूर रेल्वे विभागाने विशेष टिकट जॉंच अभियानांतर्गत रू.15,70,035 रु केले वसुल

सोलापूर रेल्वे  विभागाने विशेष टिकट जॉंच अभियानांतर्गत रू.15,70,035 रु केले वसुल 

सोलापूर रेल्वे  विभागा ने  दिनांक 06.05.2023 ला विशेष टिकट जॉंच अभियानांतर्गत रू.15,70,035/- वसुल केले आणि 19 अनधिकृत विक्रेता  वर कारवाही  करण्यात आली. 

मध्य रेल्वे सोलापुर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक श्री.एल. के. रनयेवले यांच्या देखरेखे  खाली आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती कल्पना बनसोडे, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री. हर्षित बिस्नोई आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री सुदर्शन देशपांडे  यांच्या देखरेखी खाली खऱ्या अर्थाने आरामदायी  आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर विभागातील गाड्यामध्ये तिकीट तपासणी मोहीम दिनांक 06.05.2023 ला राबविण्यात आली आहे. 


विशेष टिकट जॉंच अभियानांतर्गत स्पॉ्ट चेकिंगच्या माध्यमातुन विशेष टिकट जॉच अभियानाचे कार्य सकाळी 06.00 वाजे पासुन ते दुपारी  02.00 वाजे पर्यंतच्या् कालावधी मध्ये एकूण 29 मेल एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना चेक केले ह्या मध्ये  विना तिकीट प्रवासी, अनियमित प्रवासी व प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे प्रवासी, घाण पसरविणारे प्रवासी व धुम्रपाण करणारे प्रवासी इत्यादी एकुण 1227 प्रवाशांना पकडून दंडात्म‍क स्वऊरूपात रू.7,52,915/-  तथा   नियमित  तिकीट जांच मिळून एकूण 2375  प्रवाशांना पकडून दंडात्म‍क स्वऊरूपात रू 15,70,035 (रूपये  पंधरा लाख सत्तर हजार  पस्तीस   फक्त‍)  आणि  कलबुर्गी रेल्वे स्थानकावर 4 कटरिंग स्टॉल वर कारवाही करून  रु. 5,000 व 19 अनाधिकृत विक्रेते कडून 6,455 दंड वसुल केले आणि दोन अनाधिकृत विक्रेत्यांना  पकडुन रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 


ह्या कार्यवाहीची प्रमुख भुमिका   तिकीट जांच विभागचे  एकूण 92 कर्मचारी  आणि रेल्वे सुरक्षा बलाचे एकूण 21  जवान मिळून संयुक्त अभियान परपडला.  


रेल प्रशासन रेल्वे प्रवाशांना असे आवाहन करते की अनाधिकृत विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारच्या अन्न, फास्ट फूड,  पिण्याच्या पाण्यांची बाटली खरेदी करू नये, कारण त्यांचा दर्जा निकृष्ट असू शकतो, अशा विक्रेत्यांवर रेल प्रशासन कारवाही करत आहे, त्या करिता प्रवाश्यानी, रेल प्रशासनाला सहकार्य करावे.


सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि त्यांनी रेल्वे प्रवास करताना, उचित तिकीट घेऊनच रेल्वे् प्रवास करावा.     

-----





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.