TDM चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट समर्थनासाठी ग्रामीण भागातील नागरीक एकवटले ; काढला टॅक्टर मोर्चा !
पुणे ( अनिस मोमीन ) : दिग्दर्शक भाऊराव कराडे यांचा 'टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी येऊन देखील त्याला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या कलाकारांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. तरी देखील त्यांच्या चित्रपटाला शो मिळाले नाहीत. त्यामुळे भाऊसाहेब कराडे यांनी चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या चित्रपटाला शो मिळावे यासाठी शिरूरमध्ये शहरातून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर रॅली काढली होती. एखादया चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट समर्थनासाठी ग्रामीण भागातील नागरीक एकवटल्याचे दुर्मिळ चित्र यावेळी दिसुन आले.
शिरुर परिसरातील गव्हाणेवाडी येथील निर्माते- दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'ख्वाडा' या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 'बबन' हा चित्रपट ही लोकप्रिय झाला होता. त्याच्या बहुचर्चित 'टीडीएम' हा मराठी चित्रपट पुण्यासह महाराष्ट्रात धडाक्यात प्रदर्शित झाला होता. परंतु चारच दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटगृहांमधून अचानकपणे हा चित्रपट काढून टाकण्यात आला. तर अनेक चित्रपटगृहांनी या चित्रपटाला प्राईम टाईम नाकारला. यामुळे खचलेल्या भाऊराव कऱ्हाडे व चित्रपटातील कलाकारांनी टोकाचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शिरूरमधील भाऊराव कऱ्हाडे यांची मित्रमंडळी व समर्थक एकवटले. कऱ्हाडे यांच्या पाठीशी उभे राहत चित्रपटाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
stay connected