कृषी महाविद्यालय, आष्टी वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विविध स्पर्धाना सुरुवात डॉ.अजय दादा धोंडे व प्रशासन अधिकारी डॉ.डि. बी. राऊत यांच्या हस्ते स्पर्धांचे उदघाटन संपन्न

 कृषी महाविद्यालय, आष्टी वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विविध स्पर्धाना सुरुवात
डॉ.अजय दादा धोंडे व प्रशासन अधिकारी डॉ.डि. बी. राऊत यांच्या हस्ते स्पर्धांचे उदघाटन संपन्न 



विकास साळवे. आष्टी


आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कृषी महाविद्यालयांमध्ये  वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विविध अंतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन दि. 09.05.2023 रोजी  डॉ.अजय दादा धोंडे व प्रशासन अधिकारी डॉ. डी.बी. राऊत  यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. दि.09 एप्रिल ते 11 फेब्रुवारी या कालावधीत कबड्डी, खो-खो, व्हाली बॉल, बॅटमिनटन, संगित खुर्ची व क्रिकेट या स्पर्धा आनंद शैक्षणिक संकुल मधील मैदानावर चालणार आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण 12.05.2023 होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मध्ये प्रमुख पाहुणे जास्त होणार आहे.वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १२.०५.२०२३ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत कृषी महाविद्यालयात  सभागृहामध्ये होणार आहे श. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. भीमराव आनंदराव धोंडे, युवा नेते अजय दादा धोंडे सर्व प्रशासन अधिकारी डॉ. डी.बी. राऊत हे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ. अजय दादा धोंडे म्हणाले की, पुढील वर्षा पासून आपण आनंद शैक्षणिक संकुल मधील कृषी महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेज, डि फार्मसी, बी फार्मसी, नर्सिंग कॉलेज, कृषी तंत्रनिकेतन कॉलेज या सर्व कॉलेजमधील प्रत्येकी तिन सांस्कृतिक कार्यक्रम असे पंचविस सांस्कृतिक कार्यक्रम आपण आनंद शैक्षणिक संकुलच्या मैदानावर मार्च महिन्यात एकाच दिवशी घेणार आहोत‌ या सांस्कृतिक गित स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघाला ७००० सात हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तर द्वितीय येणाऱ्या संघाला ५००० पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे तर तृतीय येणाऱ्या संघाला ३०००  हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे असे डॉ अजय दादा धोंडे  यांनी या वेळी सांगितले. या चालु असलेल्या विविध स्पर्धाचे नियोजन प्रा.एस.आर. देसाईपाटील, प्रा.पी.आर. काळे, प्रा. एल.एस. मिसाळ, प्रा. पी.एन.जाधव,   प्रा‌. बी. आर.गुंजाळ, प्रा.कु. एस.एल.बनकर, प्रा.कु.डी.सी. सातव, करत आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.