मुंबईतील झोपडपट्टी धारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय..
अडीच लाखात मिळणार स्वतःचं पक्क घर...!!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२५ मुंबई : राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एक जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील झोपडीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना फायदा होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या दोन लाख 50 हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्याशिवाय या निर्णयामुळे झोपडपट्टी असलेल्या जागांचा विकास होणार आहे.
दरम्यान राज्य शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार, या नव्या योजनेतील लाभार्थी झोपडपट्टीवासियांच्या अटी आणि शर्थी निश्चित करण्यासाठीची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
आगामी काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणूक लक्षात घेता, राज्य सरकारकडून सातत्याने मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महत्त्वाच्या महापालिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
मुंबईतील १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या कालावधीतील झोपडपट्टीधारकांना आता अडीच लाखात घरं देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.या निर्णयाचा फायदा लाखो झोपडपट्टीवासियांना होणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत अडीच लाखात हक्काचे घरं देण्याचा निर्णय मोठी कलाटणी देणारा ठरू शकतो.




stay connected