रत्नाकर आप्पा शिंदे एक निष्ठावान शिवसैनिक झाला बीड जिल्हा प्रमुख

 रत्नाकर आप्पा शिंदे एक निष्ठावान शिवसैनिक झाला बीड जिल्हा प्रमुख



 केज प्रतिनिधी (रंजित घाडगे)


शिवसेना पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचा बहुमान पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून सातत्याने होतं आलेला आहे त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे रत्नाकर शिंदे एक निष्ठावान शिवसैनिक.

रत्नाकर शिंदे यांनी हिंदुऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आत्मसात करून सण 1998 मध्ये शिवसेना पक्षाचे काम सुरु केले. त्यावेळेस त्यांनी शाखा सचिव , केज तालुका सचिव , तालुका प्रमुख म्हणुन काम केले. 'त्यांनी या दरम्यान विविध अंदोलनाच्या माध्यमातून केज तालुक्यामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली .  तसेच पक्षश्रेष्ठीकडून आलेल्या सुचनांचे तंतोतत पालनही केले. 


केज तालुक्यामध्ये शेतकरी , कष्टकरी , कामगार , विद्यार्थी , केज बसस्थानक आदि सामाजीक विषय हाताळत रस्ता रोको , बोंबाबोंब मोर्चा , आमरण उपोषण , साखळी उपोषण आदि विविध अंदोलने उभी केली. हे करत असताना ते केज तालुक्यातील एक एक कार्यकर्ता जोडत गेले. त्यांच्यावर वयक्तीक एकही गुन्हा नोंद नसताना केवळ सामाजीक प्रश्नासाठी त्यांच्यावर झोपपटी दादा सह इतर 29 केसेस दाखल झाल्या. तरी देखील ते निष्ठावान पणे पक्षाच्या विचारधारे प्रमाणे कार्य करतच राहीले. त्यांच्या या 25 वर्षाच्या संघर्षयुक्त सर्व कामांची पक्षश्रेष्ठींनी वेळोवेळी दखल घेतली आणी म्हणूनच एक निष्ठावान शिवसैनिकावर बीड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


त्यांच्या या निवडीने सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक आणी अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.