जामखेड बाजार समिती निवडणूकीत भाजप राष्ट्रवादीला समसमान प्रत्येकी नऊ जागा

 जामखेड बाजार समिती निवडणूकीत भाजप राष्ट्रवादीला समसमान प्रत्येकी नऊ जागा

     - - - - - - - - - - - - - - - 


जामखेड - कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होऊन राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला प्रत्येकी नऊ जागा जिंकल्या. ग्रामपंचायत मतदार संघातील चारही जागा भाजपने जिंकल्या आहेत तर सेवा संस्थेच्या ११ पैकी ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या तर भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत. व्यापारी मतदार संघातील दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या व हमाल मापाडीची जागा १ जागा भाजपने जिंकल्या. राष्ट्रवादी व भाजपला समसमान जागा मिळाल्याने कर्जत बाजार समितीची पुनरावृत्ती जामखेड बाजार समितीत झाली आहे. 

      पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे विजयी झाले तर विद्यमान पाच संचालकापैकी तीन संचालक पराभूत झाले असून त्यामध्ये माजी उपसभापती शारदा भोरे यांचा समावेश आहे. तर माजी सभापती सुधीर राळेभात व गौतम उतेकर विजयी झाले आहेत. 


   आ. रोहीत पवार विजयी उमेदवार 

अंकुशराव ढवळे, सुधीर राळेभात, कैलास वराट, सतिश शिंदे, नारायण जायभाय,रतन चव्हाण, अनिता शिंदे, राहुल बेदमूथ्था, सुरेश पवार 


आ. राम शिंदे यांचे विजयी उमेदवार 

विष्णू भोंडवे, गौतम उतेकर ,सचिन घुमरे, 

गणेश जगताप, शरद कार्ले, वैजीनाथ पाटील, नंदकुमार गोरे, सिताराम ससाणे, रविंद्र हुलगुंडे 


पराभूत संचालक 

उपसभापती शारदा भोरे, तुषार पवार, महादेव डुचे 

विजयी उमेदवार - गौतम उतेकर, सुधीर राळेभात हे दोघेही बाजार समितीचे माजी सभापती आहेत. 

         

बाजार समिती निवडणूकीसाठी रविवारी सकाळी 8 ते 4 या कालावधीत चुरशीने 98.48 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहाच्या दरम्यान जामखेड येथील आदीत्य कार्यालयात मतदान पेटी आणल्या यानंतर मतमोजणीस सुरवात झाली. 

     चौकट 

बाजार समिती निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांनी पत्रकारांना मतमोजणी कक्षात सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना विनंती करून ही सोडले याचा पत्रकार संघाने निषेध करताच पत्रकारांना मतमोजणी कक्षात सोडण्यात आले 

सोसायटी सर्वसाधारण जागा विजयी उमेदवार

( राष्ट्रवादी )

सुधीर राळेभात

कैलास वराट

अंकुश ढवळे

सतिश शिंदे

भटक्या विमुक्त जाती 

नारायण जायभाय 

महिला राखीव 

रतन चव्हाण, अनिता शिंदे 


( भाजप )

गौतम उतेकर

सचिन घुमरे

विष्णू भोंडवे

अर्थिक दुर्बल मधुन गणेश जगताप


ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ विजयी 

भाजप 

शरद कार्ले, वैजीनाथ पाटील

अनुसूचित जाती जमाती सिताराम ससाणे 

ग्रामपंचायत दुर्बल घटक 

नंदकुमार गोरे 


व्यापारी मतदार संघ 

  राष्ट्रवादी काँग्रेस 

राहूल बेदमूथ्था, सुरेश पवार 


हमाल मापाडी 

भाजप 

रवींद्र हुलगुंडे

    यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी सभापती यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली .

प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.