सेवासंकल्प हॅपीगृप नागपूर संस्थेने नवव्या वर्षात पदार्पण

सेवासंकल्प हॅपीगृप नागपूर संस्थेने नवव्या वर्षात पदार्पण


सेवासंकल्प हॅपीगृप नागपूर संस्थेने नवव्या वर्षात पदार्पण


 १० मे‌ म्हणजे सुवर्ण दिन ! आज आमच्या संस्थेचा स्थापना दिवस.अतिशय हर्ष होतोय सांगायला की, आमच्या 

 सेवासंकल्प_हॅपीगृप_नागपूर संस्थेने नवव्या वर्षात पदार्पण केले आहे. अनेक गोड कटू अनुभव आणि भरभरुन आनंद व समाधान देणारा हा प्रवास.आजच्या या आनंदसोहळा प्रसंगी आम्ही भोजन शेल्टर च्या शेड चे  उद्घाटन केले.तसेच मेडीकल रुग्णालयातील नवजात बाळाला ड्रेस आणि बाळाच्या आईला बिस्कीट पॅकेट वाटप केले. गृप मधील कार्यात मोलाचे योगदान देणार्‍या सखींचा सत्कार  देखिल करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या संचालिका सौ अंजली देशमुख घंटेवार तसेच मिनाक्षी सुखदेवे, गीता शिंदे, वैशाली येवले, अर्चना बारमाटे, गौरी तीवारी ,पुष्पा चौरे, कांचन चट्टे,माधवी गंगथडे,स्नेहल गजभिये,सुनिता कांबळे आदी मान्यवर सदस्या उपस्थित होत्या.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.