पिंपरी घुमरी येथे युवक काँग्रेसने साजरा केला आंनदोत्सव
संदीप जाधव / कडा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. याचा पिंपरी घुमरी येथे युवक काँग्रेसने आंनदोत्सव साजरा केला आहे.
भाजपच्या काळात झालेली महागाई, हुकूमशाही, तोडा फोडोचे राजकारण, ईडी, सीबीआईचा वापर आदी कारणामुळे कर्नाटकाच्या मतदारांनी भाजपला नाकारले आहे. कर्नाटकमधील या विजयाने फटाकेची आतषबाजी व पेढे वाटुन विजयाचे स्वागत करण्यात
आले.
कर्नाटकच्या जनतेने भारत जोडण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले असून काँग्रेसच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला साथ दिली आहे. तसेच भाजपाच्या विखारी प्रचाराला नाकारले असून शांतता, विकास आणि समृद्धीच्या बाजूने आपला कौल दिला आहे.
प्रशांत जाधव,विधानसभा अध्यक्ष , युवक काँग्रेस
युवक तालुका अध्यक्ष सचिन वारुळे , गणेश नवले , अनिकेत महाडिक , तानाजी क्षीरसागर , मेहमूद शेख , अविनाश वारुळे , गणेश घुमरे,परमेश्वर साबळे,धैर्यशील गोरे,बळी साबळे, तानाजी क्षीरसागर आदी उपस्तिथ होते
stay connected