आपघाताची मलिका सुरूच आजही एक ठार एक जखमी..

 आपघाताची मलिका सुरूच आजही एक ठार एक जखमी..



केज प्रतिनिधी दि.१७


मांजरसुंबा ते अंबाजोगाई रोडवर सतत आपघाताची मलिका सुरूच आहे आज दि.१४ रोजी दुपारच्या दोन ते अडीच्या वेळेस

 ढाकेफळ जवळ अज्ञात इर्टिका चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारास जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी झाला आहे. पैठण (सा) येथील प्रशांत अनुरथ सरवदे वय ३२वर्षे व अमोल सरवदे हे शाहिन मोटारसायकल वरून केजहुन गावी परत जात असताना अंबाजोगाई कडून येणाऱ्या अज्ञात इर्टीका चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. यात प्रशांत अनुरथ सरवदे हा जागीच ठार झाला व अमोल सरवदे हा जखमी झाला आहे. चारचाकी वाला डायव्हर गाडी घेऊन बीड रोड कडे पसार झाला असल्याचे समजते .मृत व जखमीला उपजिल्हा रुग्णालयात १०८ ॲमब्यूलन्स ने दाखल केले आहे.

कालच या रोड वर चारचाकीने बजाज एम ए टी वर जाणाऱ्या महादेव पांचाळ याना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता चोवीस तासातील ही दुसरी घटना  आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.