भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित आद्यकवी मुकुंदराज ग्रामीण कवी संमेलन लातूर येथे अगदी थाटात संपन्न

 भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित आद्यकवी मुकुंदराज ग्रामीण कवी संमेलन लातूर येथे अगदी थाटात संपन्न



प्रतिनिधि - (लातूर)

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच, लातूर जिल्हा आयोजित आद्यकवी मुकुंदराज ग्रामीण कवी संमेलन लोकनेते विलासराव देशमुख भारत स्काऊट गाईड सभागृह लातूर येथे ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री.भारत सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक श्रीमती संगीताताई भाऊसाहेब जामगे प्रदेश उपाध्यक्षा अ.भा.म.सा.परिषद, तसेच प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक मा.लक्ष्मण हेंबाडे, प्रादेशिक उपायुक्त मा. अविनाश देवसटवार,मा.शंकर चामे यांच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात पार पडले.

 यावेळी संस्थेची मुख्य समिती अध्यक्ष मा.विशाल सिरसट, उपाध्यक्ष मा.विजय जायभाये, मराठवाडा प्रदेश कार्याध्यक्ष मा.अजयकुमार वंगे, लातूर जिल्हा अध्यक्ष मा. योगेश हरणे, कोषाध्यक्ष मा.कल्याण राऊत,मा.प्रमोद सुर्यवंशी, मा.श्रीशैल सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज व शिक्षणाची धरित्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन,दीप प्रज्वलन,पूष्प अर्पण करून झाली.

लातूरच्या भूमीत अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.आरंभी कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्रीमती संगीताताई भाऊसाहेब जामगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.पदरी आलेल्या दुःखातून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.असं त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं.

तद्नंतर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक मा.डॉ लक्ष्मण हेंबाडे यांच्या बहारदार कविता *डोळ्यातला पाऊस* व अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन लाभले.

    *मदर्स डे* निमित्ताने खास आईवर आधारित कवितेने काव्य संमेलनाची सुरुवात झाली. सुरुवातीलाच मा.अन्नपूर्णा गंगणे व त्यांच्या विद्यार्थिनी यांनी गोड आवाजात स्वागत सादर केले तर सोलापूरचे कवी श्रीशैल सुतार यांनी पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन केले त्यांच्या सूत्रसंचालनाचे संमेलनाध्यक्ष व उपस्थित सारस्वतांनी तोंडभरून कौतुक केले.शीघ्र चारोळी करून संमेलनात आणखी रंगत व उत्साह निर्माण केला.यानंतर भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच लातूर जिल्हा समितीतील सर्व पदाधिकारी तसेच सन्माननीय व्यासपीठ यांना आकर्षक सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मा. डॉ.शंकर चामे यांनी थोडक्यात प्रास्ताविक केले. संस्थापक अध्यक्ष मा.विशाल सिरसट, अध्यक्ष मा.विजय जायभाये, उपाध्यक्ष  यांनी आपल्या संस्थेची सुरूवात ही नवकवी यांच्या करिता एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता केली असं सांगून महाराष्ट्रात एकूण ३६ शाखा असल्याचे त्यांनी सांगितले.एकाहून एक सरस कविता सारस्वतांनी सादर केल्या.

प्रमोद सुर्यवंशी यांचा गोड आवाज ऐकावयास मिळाला तसेच विजयकुमार पांचाळ,दिपक नागरे,शिखरे सर,अनंता साळूंके, कल्याण राऊत,विजय माने,कवी घडे, कवयित्री गीताश्री नाईक,सुलक्षणा सोनवणे सरोदे यांनी त्यांच्या सुंदर कविता, गझल    सादरीकरण केल्या.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात नवोदित तरुण कवी नी आपल्या सुंदर अश्या रचना सादर केल्या.आणि त्यांना एक व्यासपीठ मिळाले असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.

दुपारी २ वाजता भोजन विश्रांती घेण्यात आली. 

दुपारनंतर मा.सविता धर्माधिकारी यांनी सुत्रसंचालन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुंदर कविता गौरव पुंडे यांनी व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरही काव्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. डॉ सुशील सातपुते यांच्या कवितेने रंगत आणली.तसेच भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच लातूर जिल्हा मराठवाडा प्रदेश कार्याध्यक्ष मा.अजयकुमार वंगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपली सुंदर अशी रचना सादर केली.

शेवटी अध्यक्षीय भाषणात 'कुणाचही अनुकरण न करता कविता लिहावी तसेच कविता लिहिणं सोपं नाही 'असे मा.भारत सातपुते सर यांनी अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केले.आद्यकवी मुकुंदराज यांच्याविषयी त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचा शेवट *सोडा की राया आता डोक्यावरला ताण* कवी श्रीशैल सुतार यांच्या बहारदार लावणीने झाला.सगळ्यात शेवटी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिमानाने नामघोष करण्यात आला.

उपस्थित सर्व सारस्वतांना  सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे  आभार कवी व लातूर जिल्हा मा.अध्यक्ष योगेश हरणे यांनी गोड शब्दांत  मानले.संपूर्ण समितीने संमेलन यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घेतले.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.