पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरा'चे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरा'चे आयोजन




 लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील 

*महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तहसील व पंचायत समितीच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत 'सशक्त नारी, समृद्ध भारत' या संकल्पनेवर आधारित 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह, निलंगा येथे घेण्यात आलेल्या शिबिराचा हजारो माता-भगिनींनी लाभ घेतला*.



महिला या आपल्या समाजाचा आधार आहेत. जोपर्यंत समाजातील महिलांचा सर्वांगीण विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे महिला वर्गाच्या अडीअडचणी समजून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिलांनी देखील स्वतः पुढाकार घेऊन स्वयं विकासासाठी पुढे आले पाहिजे. महिला व बाल विकासासाठी शासन-प्रशासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. त्याचा फायदा घेऊन स्वतःचा आणि कुटुंबाच विकास साधण्यासाठी पुढे या, असे आवाहन यावेळी *आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब केले*.


उपकार्यकारी अधिकारी गिरी साहेब, निलंगा उपविभागीय अधिकारी शोभाताई जाधव, देवणीचे तहसीलदार गुळवे साहेब, शिरुरअनंतपाळचे तहसीलदार जढाळ साहेब, निलंगा गटविकास अधिकारी अमोलजी ताकभाते, देवणी गटविकास अधिकारी चव्हाण साहेब, शिरुरअनंतपाळचे गटविकास अधिकारी अकेले साहेब, माजी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, भाजप उपजिल्हाध्यक्ष शेषेरावजी मंमाळे, शिरुरअनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेशजी पाटील, देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथजी गरीबे, आदींसह सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य अधिकारी, देवणी, शिरुरअनंतपाळ, निलंगा येथील बचत गट व अंगणवाडी सेविका व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.