BEED | राष्ट्रवादीला अजून लोकसभेचा उमेदवार निश्चित करता आला नाही - खा. प्रीतम मुंडे
- मी काम करते का नाही याचा लेखाजोखा जनता देईल. विरोधी उमेदवार चांगला असावा, आपल्याला प्रेरणा मिळते. राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अर्धी आपण जिंकलेली आहे. तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर मला आनंद वाटायला हवा. पण मला आनंद वाटत नाही. त्यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी समोर लढवायच ठरवलं तर काही नाही. तसं आम्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत राहिली आहे.
महिला खेळाडूविषयी बोलताना खासदार प्रितम मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगीतले की महिला खेळाडूंची तक्रार आल्यास दखल घेतली पाहिजे. दखल घेतली जात नसेल तर लोकशाही मध्ये ही घटना स्वागतार्ह नाही. योग्य कारवाई झालीच पाहिजे. असे म्हणत भाजपाला घरचा आहेर दिला आहे .
- परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा दर्जा गेलाय ज्यांनी असं सांगितलं. त्याचा अर्थ या आधी दर्जा होता. मग त्याचे कागदपत्रे असतील. ज्यांनी असे दावे केलेले असतील त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे. वाद निश्चित आहे. दुर्दैवाने हा वाद एकट्या परळी ज्योतिर्लिंगाचा नाही अनेक ज्योतिर्लिंगा संदर्भात आहेत. केंद्राच्या यादीत यावं म्हणून मी प्रयत्न करीत आहे. असे खासदार प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले .


stay connected