बी.फार्मसी व डी.फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) ला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार आहेत का?

 बी.फार्मसी व डी.फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) ला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार आहेत का?



शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुरु होणाऱ्या डी.फार्मसी व बी.फार्मसी च्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवणे जेणे करून प्रवेश घेताना कोणतेही नुकसान होणार नाही. इयत्ता बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला आहे आणि एम.एच.टी.- सी.ई.टी. व  नीट चा १२ जून ला अपेक्षित आहे. निकाल लागताच महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल तेव्हा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. ऐन वेळेवर विद्यार्थी-पालकांची प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठी धावपळ होते. होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्र तयार करून ठेवणे अत्यंत महत्वाचे ठरते.

सर्व विद्यार्थ्यांना दहावीचे मार्कशीट, बारावीचे मार्कशीट, स्कूल लिविंग सर्टिफिकेट (शाळा सोडल्याचा दाखला), नॅशनालिटी (रहिवास प्रमाणपत्र), डोमिसाईल सर्टिफिकेट (अधिवास प्रमाणपत्र), इन्कम सर्टिफिकेट (उत्पन्नाचा दाखला), आधार कार्डची प्रत, राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुक ची प्रत, पासपोर्ट च्या आकाराचे फोटो हे सर्व  बंधनकारक आहेत. काही कागदपत्र हे बंधन कारक नसून फक्त लागू असल्यास जमा करावे लागतात जसे कि एम.एच.टी.- सी.ई.टी. किंवा नीट स्कोर कार्ड (बी.फार्मसी साठी), कास्ट सर्टिफिकेट (जातीचा दाखला), कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट (जात वैधता प्रमाणपत्र), नॉन क्रीमिलेअर सर्टिफिकेट, इ.डब्लू.एस. सर्टिफिकेट (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र), डिफेन्स सर्टिफिकेट (संरक्षण प्रमाणपत्र), हैन्डीकॅप सर्टिफिकेट (अपंगत्व प्रमाणपत्र), मैरेज सर्टिफिकेट (विवाह नोंदणी प्रमाणपत्र), इ.

प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता लक्ष्यात घेऊनच तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांचे कडून प्रवेश दिले जातात. विद्यार्थ्यांना डी.फार्मसी या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र किंवा  गणित या विषयांसह विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि बी.फार्मसी साठी घ्यावयाचा असल्यास भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र किंवा गणित या विषयांसह विज्ञान शाखेतून बारावी किमान ४५% (खुलावर्ग) तसेच ४०% (मागासवर्ग) असे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच त्यांनी एम.एच.टी.- सी.ई.टी. अथवा नीट ही प्रवेश परीक्षा  दिलेली असावी अशी माहिती सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चे संस्थापक अध्यक्ष, श्री. रंगनाथ कि. वराळ (पाटील), सचिव श्री. विराज रं. वराळ (पाटील) व प्राचार्य, डॉ. तुषार त्र्यं. शेळके  यांनी दिली.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.