केरळ स्टोरीच्या आड चित्रपट गृह परिसराचा बेकायदेशीर वापर करु देणा-या चित्रपट गृहांचे परवाने रद्द करा - वंचित बहुजन आघाडी चे निवेदन.
-----------------------------------------------
औरंगाबाद दिनांक १९ ( प्रतिनीधी )
केरल स्टोरी या काल्पनिक चित्रपटाच्या आड चित्रपट गृहांचा बेकायदेशीर पणे भडकावू व विद्वेष पसविण्यासाठी गैरवापर होत आहे अश्या कृतींवर आळा घालने गरजेचे असुन धर्मांध व जातीयवादी पक्ष संगठना नव-नवीण माध्यमांचा गैरवापर करुन दंगलींची मानसिकता घडवीत आहे या बाबतीत प्रशासनाने गंभीर व कडक कारवाई करुन आयोजकांवर गुन्हे दाखल करुन चित्रपटगृहांचे परवाने रद्य करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय समीतीच्या वतिने विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या नेतृत्वात व प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ता फारुक अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्तांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या वेळी. महाराष्ट्र राज्य प्रवक्ते फारुक अहमद साहेब व पक्षाचे विभागीय महासचिव महेश निनाळे,जितेंद्र सिरसाठ,तय्यब जफर सह औरगांबाद जिल्हा समितींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected