MUMBAI | मुंबई मालाड मालवणी पोलीस ठाणे कडुन २० किलो २१० ग्रॅम गांजा जप्त, आरोपी अटकेत
संजय पंडीत ( मुंबई )- मुंबई मालाड (मालवणी) येथे अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमे अंतर्गत मालवणी पोलीस ठाणेकडुन अंमली पदार्थ बाळगणारे / विक्री करण्याऱ्या इसमांवर एकुण १९ केसेस करण्यात आल्या असुन त्यामध्ये २० आरोपींना अटक करण्यात आले आहे. तसेच दिनांक १९/०५/२०२३ रोजी खालील नमुद प्रमाणे व्यापारमात्रेच्या प्रमाणापेक्षा जास्त असलेले (कमरशिअल कॉन्टेटी) गांजा मध्ये ही अंमली पदार्थाची केस करण्यात आली आहे.
मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई व मा. सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबई यांनी मुंबई शहर आयुक्तालयांतर्गत विशेषता मालवणी पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ गुन्हा आटोक्यात यावा. त्यासाठी दिनांक २४/०४/२०२३ पासुन विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस आयुक्त (मालवणी विभाग), मा. शेखर भालेराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाणे अंतर्गत एनडीपीएस अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत दिनांक १९/०५/२०२३ रोजी मालवणी पोलीस ठाणेचे निगराणी पथकाचे अधिकारी सपोनि.निलेश साळुंके हे निगराणी पथकासह अंमलीपदार्थ विरोधी गस्त करीत असताना हे पथक मालवणी पोलीस ठाणे बिट क्र.०४ येथे गस्त करीत असताना खारोडी येथील क्रॉस जवळ, मार्वे रोड येथे पोहचले असता साधारणतः २२.०० वाजताचे दरम्यान सपोनि निलेश साळुंके यांना त्यांचे खास बातमीदारने माहिती दिली. रिक्षा क्र. ०२ इक्यु ८०७९ यामध्ये एक महिला हि मोठया प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ घेवुन मालवणी परिसरात येत आहे. त्यानंतर लागलीच सपोनि. साळुंके यांनी वर नमुद पथकास रस्ताचे दोन्ही बाजुस उभा करून सदर क्रमांकाच्या रिक्षावर पाळत ठेवली असता साधारणतः २२.१५ वाजताचे सुमारास सपोनि. साळुंके यांना सदरची रिक्षा हि हॉटेल राधा-कृष्णच्या गल्लीतुन जनकल्यान नगरच्या दिशेन जाताना दिसली. लागलीच पोलीस पथकासोबत पाठलाग करून बिट अधिकारी पोउनि अमर शिंदे यांचेसह " जनकल्याण नगर बिट क्र.०४ पोलीस चौकीसमोर, जनकल्याण नगर, मालाड (पश्चिम), मुंबई " येथे सदरची रिक्षास घेराव घालून ताब्यात घेतली.
सदर रिक्षामध्ये महिला आरोपी नामे सौ. उषा पियुष पवार, हि / ३६ वर्षे, हिचे ताब्यात एक पांढऱ्या रंगाची गोणी दिसुन आली. एनडीपीएस अॅक्ट मधील कायदेशिर तरतुदींची पुर्तता करून पोनि बिले तसेच एक महिला व पुरूष पंचासमक्ष सदर महिलेच्या ताब्यात असलेल्या गोणी उघडुन पाहिली असता त्यामध्ये एकुण २० किलो २१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ अंदाजे किंमत रुपये ६,०६,३००/- मिळुन आला आहे.
stay connected