मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

 मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.




प्रतिनिधी : संजय पंडित


दि.१४ मुंबई : औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे आपले सरकार आल्यानंतर आपण सर्वात आधी हा निर्णय घेतला. आता मुंबईतील कोस्टल रोडलाही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येईल. तसंच कोस्टल रोडच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा एक दिमाखदार भव्य पुतळा उभारण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६६ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत सर्वांना यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच या ठिकाणी जयंती होते आहे. त्यामुळे त्याचा हा आनंद मोठा आहे. संभाजी महाराज यांची आज ३६६ वी जयंती होत असतानाच आजच्या या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे त्याचाही आनंद वेगळा असल्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. त्यांनी घोषणा केल्यानंतर उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या ठिकाणी अनेक लोकांनी संभाजी महाराज यांना हरवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र त्यांच्या शौर्याविषयी काही इतिहासकरांनी काही वेगळं लिहिलं असेल पण ती वस्तूस्थिती नाही असंही एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढावला आहे.छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम त्यांनी या ठिकाणी त्यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवण आपण जतन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

त्यांनी मुघल साम्राज्याबरोबर लढा दिला, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १२० लढाया लढल्या होत्या, मात्र त्यांचा कधीही पराभव झाला नाही. भविष्यातील आखणी करून त्यांनी जगात कुठे नसतील असे जलदुर्ग या ठिकाणी उभारले गेले आहे.

त्यामुळे या ठिकाणी हीच प्रेरणा घेऊन नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्राला स्थान दिलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या ठिकाणी होणारा नौदलाचा दिन आता सिंधुदुर्ग येथील जलदुर्गात होणार आहे.तसेच आपण औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, त्यामुळे सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रथम तो निर्णय घेतला असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.



मागच्या सरकारने सरकार अल्प मतात आल्यावर घाई घाई ने हे निर्णय घेतला होता, पण त्या नंतर अधिकृतपणे आपण त्याला परवानगी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

औरंगाजेबाने या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांना प्रचंड त्रास दिला होता, त्यांनी त्यांनी धर्म बदलायला सांगितला होता. मात्र त्यांनी त्यांना जुगारले नाही.

या ठिकाणी जो कोस्टल रोड होणार आहे त्या रोडला आता छत्रपती संभाजी महाराज हे नाव देणार आहोत. याच कोस्टल हायवेच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार असा पुतळा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.