भाजप युवा मोर्चाच्या वतीने मॅनेजमेंट गुरु युवा नेते Arvind Bhau Patil Nilangekar साहेब यांचा Chhatrapati Shivaji Maharaj चौक निलंगा येथे भव्य सत्कार.......
लातुर (प्रतिनिधी ) -
आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या निलंगा, औराद शहा. आणि देवणी या तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये संस्मरणीय आणि आपल्या ऋणात कायम बांधून ठेवणारा विजय मिळवून दिल्याबद्दल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्यदिव्य सत्कार करण्यात आला.
युवाशक्तीच्या प्रेरणेतून माजी नगरसेवक सुमितजी दूरूगकर, विशालजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वरजी चेवले, संघटन सरचिटणीस तानाजीराव बिराजदार, निलंगा युवामोर्चा तालुकाध्यक्ष तम्माजी माडीबोणे, देवणी युवामोर्चा तालुकाध्यक्ष रामलिंगजी शेरे, शिरूर अनंतपाळ युवामोर्चा तालुकाध्यक्ष गणेशजी मोहिते, भाजपा शहराध्यक्ष गणेशजी सलगरे, संघटन सरचिटणीस आशिषजी पाटील युवामोर्चाचे नागेशजी पाटील आणि युवा मोर्चा सरचिटणीस अर्जुनजी पौळ यांच्या पुढाकारातून हा नागरी सत्कार घेण्यात आला. युवाशक्तीचा जल्लोष आणि सहकार क्षेत्रातील बदलांविषयी त्यांच्या मनात होत असलेली जागृती ही निश्चितच देशाचा आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी आश्वासक आहे.
या निवडणुकांमध्ये मतदार बांधवांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून बाजार समितीचा कारभार पारदर्शक व शेतकरी हिताचा करण्यात येईल. या बाजार समितींच्या कारभारातून निलंग्याचा नावलौकीक करण्याचे प्रामाणिक प्रयत्न संचालक मंडळाने करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Shivaji Maharaj History in Marathi
कार्यकर्ते हेच माझे कुटुंब असून आगामी काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपण कार्यकर्त्यांना विजयी करण्याकरिता जीव ओतून प्रामाणिक प्रयत्न करू. या निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय संपादन करण्याकरिता कार्यकर्त्यांनी मला आपले बहुमुल्य सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष ॲड. संभाजीराव पाटील जी, जिल्हा संघटन सरचिटणीस संजयजी दोरवे, शहराध्यक्ष ॲड. वीरभद्रजी स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव जी मंमाळे, निलंगा तालुकाध्यक्ष शाहूराजजी थेटे, शिवसेना शिंदे गट उपप्रमुख सुधीर जी पाटील, रिपाईचे अंकुशजी ढेरे यांच्यासह निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected