महाराष्ट्र दिन
जय जयकार
एक मे एकोणीशे साठ रोजी
महाराष्ट्र राज्याची स्थापना
जय -जयकार करती प्रजा
नव क्रांतीच्या हो आगमना ....१
शाहीर,क्रांतिकारकांच्या भू
जन्मलो आम्ही रक्त रंजीत
मायभूमी आखीव- रेखीव
भाग्य उजाडले याच भूमीत ...२
संत ज्ञानेश्वर,तुकाराम,एकनाथ
फुले,शाहू,शिवबा, आंबेडकर
सावित्री,अहिल्याबाई,फातिमा
विचारांनी भू झाली अजरामर...३
विशाल सह्याद्रीच्या सप्त रांगा
शिवबाच्या प्रतापाचे साक्षीदार
गडकिल्ल्यांचे शोभे आभूषण
वारकऱ्यांचे ठरलोत वारसदार...४
महाराष्ट्र असे राज्य आमुचे
गर्व तयाचा प्रिय जन्मभूमी
संस्कार संतांचे याच भूवर
तीच ठरली अखेर कर्मभूमी...५
नद्या,पर्वत,दर्या,डोंगर,झरे
निसर्ग पसरला दाही दिशा
ऐतिहासीक वास्तूही सुंदर
कीर्तीने ते उजाळती निशा...६
सुख,शांती,समाधान लाभे
विश्वास आमचा प्रिय भुवर
हो नाना जाती,धर्म,पंथाचे
नांदती सुखाने येथे जन्मभर...७
*सौ.प्रतिमा अरुण काळे*
*निगडी प्राधिकरण पुणे,४४*
*दिनांक:- १ मे २०२३*
*विषय :- महाराष्ट्र दिन*
*शीर्षक:- जय जयकार महाराष्ट्र दिनाचा*
जय जयकार महाराष्ट्र दिनाचा
सीमेवर लढणाऱ्या शूर वीरांचा ||धृ||
याच भुवर जन्मले शूर मावळे
रूपडे दैवत विठोबाचे सावळे
करू गोड सोहळा साजरा कार्याचा
सीमेवर लढणाऱ्या शूर वीरांचा ||१||
महान संतांची निर्मळ जन्मभूमी
गुणगान करू कोमल कर्मभूमी
निष्ठेने इतिहास वेचूया शौर्याचा
सीमेवर लढणाऱ्या शूर वीरांचा ||२||
विज्ञानाने केली अप्रतिम प्रगती
हर क्षेत्री कधी ना व्हावी अधोगती
पाढा वाचा वीर ,महान संस्कृतीचा
सीमेवर लढणाऱ्या शूर वीरांचा ||३||
stay connected