वंचित घटकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी कोरो इंडियाच्या माध्यमातून भटके विमुक्त आदिवासी विकास संशोधन केंद्र
वंचित घटकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी कोरो इंडियाच्या माध्यमातून भटके विमुक्त आदिवासी विकास संशोधन केंद्र कार्य करत आहेत .....भटके विमुक्त आदिवासी विकास संशोधन संस्था व कोरो इंडिया ग्रासरुट नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत दि 27-4-23 दिवशी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका येथील ग्रामपंचायत खांडवी गावा अंतर्गत आंबू नाईक तांडा येथील बंजारा समाजासह तुका नाईक तांडा येथील पारधी वस्ती मधील पारध्याच्या पालावर जाऊन पारधी समुहाची तसेच बंजारा लोकांशी कोरो इंडियाचे मराठवाडा समन्वयक विलास मगरे सर यांनी भेट घेतली विभागीय समन्वयक विलास सर यांनी बंजारा व पारधी समुहाच्या वयोवृद्ध महिला कंटुब प्रमुख महिला पुरुष, मुले यांच्या बरोबर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या विविध विषयांसह संविधानाने दिलेले मुलभूत हक्का विषयी विलास मगरे सर यांनी पारधी व बंजारा समूहांना योग्य असे सविस्तर मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत भटके विमुक्त आदिवासी विकास संशोधन संस्थेचे लिडर किशोर भोले यांच्याशी ही वंचित असलेल्या घटकांचे सक्षमीकरण करण्या संदर्भात चर्चा केली सर्व समूहांना योग्य तो न्याय कसा देता येईल आणि या समुहांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे कसे अपेक्षित आहे अशी सविस्तर चर्चा भेटीच्या निमित्ताने विभागीय समन्वयक विलास मगरे सर यांनी केली
stay connected