NAGPUR | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद
Vdo पहा👆
नागपूर (प्रतिनिधी ) -
स्वागतहार्य आहे, अहिल्यादेवी होळकर यांनी पुरोगामी विचार दिला, पण त्या विचाराने सरकारने काम करावं,
केवळ नाव देण्याची घोषणा करून खिरापत वाटण्याचं काम सुरू आहे, अहिल्यादेवी माते सारख सरकारने करावे.
यांच्याजवळ जनतेला सांगण्यासाठी काही जनतेच्या हिताचे काम नाही..
औरंगाबाद नावाचा घोळ कायम आहे, सरकारने भूमिका स्पष्ट करावी, की मुस्लिमांचा विरोध आहे, त्या पद्धतीने राज्यकारभार करावा
महाराष्ट्र सदनात जयंतीसाठी प्रतिमा बाजूला केली, सरकारने या दोन तोंडी कारभाराच उत्तर द्यावे
लोकांचा विश्वास आता सरकारवर राहिला नाही....हे नापास झालेले सरकार आहे, कितीही प्रयत्न केला तरी डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही.
फडणवीस यांनी खोटा कायदा आणून 16 टक्के मराठयाना आरक्षण देण्याचं काम केल
सातत्यानं कुणबी मराठा मध्ये भांडण लावण्याच काम सुरू आहे,
नागपूर कोर्टात फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवले, त्यात वकिलांनी माहिती लपवली असे सांगितले, कोणाची दिशाभूल करत आहे,
मराठा कुणबी हे काय चाललं महाराष्ट्रात, कुणबीला किती आरक्षण आणि माराठा यांचं आरक्षण किती स्पष्ट करावे
सरकार दोन समाजात भांडण लावण्याच काम हे सरकार करत आहे का? हे स्पष्ट करावे. मराठा कुणबी समाज जागृत आहे, हा डाव यशस्वी होणार नाही, लोकांची दिशाभूल करण्याच काम सरकार करत आहे,
मराठ्याना कुणबी करू असे म्हणत आता सरकारने फसगत करू नये, सरकार मनमानी काम करत आहे, जाहिरातीवर हजारो कोटी खर्चून जनतेच्या पैश्याची लूट आहे,
शहराचे नाव बदलून भाजपला फायदा होणार नाही, मागील 9 वर्षपासून विश्वगुरू म्हणणारे यांनाही फायदा होणार नाही..
मराठा समाजाची मागणी होती ओबीसितून नव्हे तर स्वतंत्र्य आरक्षण देण्याची मागणी नव्हती.
ओबीसी समाजाच काढून मराठा समाजाला देणार आहे असे सांगून, राजकीय पोळी शेकण्याचं काम भाजप सरकारच आहे.
आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला नाही, राज्य विधिमंडळात कायदा करून समाजाची फसवणूक केली.
शब्दफेक करून कुणबी मराठ्यांत भांडण लावण्याचे काम करत आहे,
कोरोनाची काळात केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांनी आचार संहिता काय केली त्याचा आढावा फडणवीस यांनी घेतला पाहिजे, लोकांचा जीव कसा वाचावला नाही, पण ते काम mva सरकारने केलं, त्यामुळे फडणवीस यांनी लकव्याची भाषा करू नये,
पाहिले केंद्रसरकारचा धोरणाचा अभ्यास करावा नंतर फडणवीस यांनी बोलावे.... असे नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले .


stay connected