Beed: जिल्ह्यात 5 दिवसाला एक मुलगी होतेय गायब...
गुजरात राज्यातून 40 हजारापेक्षा जास्त महिला बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले. यानंतर महाराष्ट्रातही या प्रकरणाची चर्चा होवून राज्यात 18 ते 25 वयोगटातील दररोज 70 मुली बेपत्ता होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात गेल्या तीन महिन्यात 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात 1600, फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली तर मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.
बीड जिल्ह्यात देखील पाच दिवसाला एक मुलगी गायब होत असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात मागील दोन महिन्यात प्रेमसंबंधातून 18 वर्षावरील 30 पेक्षा अधिक महिला, मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर गायब झालेल्या मुलींमध्ये 14 ते 18 वर्षातील मुली गायब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. अगदी दहावीच्या वर्गात शिकणारी मुलीही प्रेमात पडून प्रियकरासोबत धूम ठोकत आहेत. मुलीं व तरुणी बेपत्ता होण्याची समस्या अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचली असून बदलती कुटूंब व्यवस्था व बदलते जीवनमान यासाठी जबाबदार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. सध्या मुलींच्या बेपत्ता होण्याची समस्या देशभर गाजत असून याविषयावर आता चर्चासत्र आयोजित होत
stay connected