सांस्कृतीक चळवळ अधिक गतीमान होण्यासाठी प्रयत्न करावेत : Rajendra Udage

सांस्कृतीक चळवळ अधिक गतीमान होण्यासाठी प्रयत्न करावेत : Rajendra Udage 


सांस्कृतीक चळवळ अधिक गतीमान होण्यासाठी प्रयत्न करावेत : Rajendra Udage


अहमदनगर - *अहमदनगर जिल्ह्यातून दोन नाट्यकर्मी रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाचे सदस्य झाले, त्यांनी सांस्कृतिक चळवळ अधिक सक्षम आणि गतिमान होण्यासाठी प्रयत्न करावेत*  असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले.

      शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी व नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश शिंगटे यांची निवड झाल्याबद्दल कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित सत्कार समारंभ ते बोलत होते.

यावेळी शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी, भगवान राऊत, राजेंद्र पवार, बबनराव गिरी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सांस्कृतिक दृष्ट्या अहमदनगर जिल्ह्याची भूमी अतिशय सुपीक असून या भूमीने सदाशिवराव अमरापुरकर,अनिल क्षिरसागर, के.के जाधव यांच्यासारखे अभिनेते तर मधु कांबीकर,लीला गांधी,राम नगरकर यांच्यासारखे रंगकर्मी  दिले आहेत.त्यामुळेच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नाव सातत्याने वरच्या क्रमांकावर असते. त्यांच्या झालेल्या या निवडीचा उपयोग जिल्ह्यातील नाट्य कलावंत, नाट्य लेखक व त्या क्षेत्रातील इतर सर्वांना होईल.

        यावेळी बोलताना पी.डी.कुलकर्णी म्हणाले की,यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली १९६१ पासून रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाची सुरुवात झालेली असून तेव्हा पासून आजतागायत मंडळाचे नियम व अटी त्याच असून समाजामध्ये सलोखा राहावा यासाठी हे नियमक मंडळ कार्यरत आहे, कोणत्याही जाती धर्माला झुकते माफ न देता सत्याच्या बाजूने उभे राहून, मनोरंजन होईल या विचाराने काम केले जाईल.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले तर खजिनदार भगवान राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शेवटी कार्यकारी मंडळाचे सदस्य बबनराव गिरी यांनी आभार मानले. यावेळी नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार व सतीश शिंगटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाल व बुके देऊन दोन्ही मान्यवरांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.