Big Breaking : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल !

 Big Breaking : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल !

Satta sangharsh


राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सत्ता संघर्ष चा निकाल आज दिल्लीमध्ये हायकोर्टात सुरू असून पहिल्या तीन निरीक्षणामध्ये हायकोर्टाने ठाकरे बाजूच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. भरत गोगावले यांचा यांची नियुक्तीच बेकायदेशीर, राज्यपालाने बहुमत चाचणी केली ती बेकायदेशीर, राज्यपालाने बहुमत चाचणी घेण्याची गरजच नव्हते, राज्यपालांच्या निर्णयावर हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. पहिल्या तीन निरीक्षणामध्ये शिंदे सरकारला मोठा झटका बसला असला तरी शिंदे सरकार सध्या तरी वाचले आहे. अपात्र आमदारांचा निर्णय लवकर अध्यक्षांनी घ्यावा असे सुद्धा कोर्टाने सांगितले. यामुळे १६ आमदारांचा अपाञ निर्णय अध्यक्ष काय घेतात याकडे पहावे लागेल.

पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्त पी एस नरसिंहा यांचा समावेश आहे.

गेल्या ११ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद करण्यात आला. यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने वकिलांनी जोरकसपणे बाजू मांडली. या निकालावर राज्यातल्या शिंदे सरकारच्या भवितव्यावरही या निर्णयाचा परिणाम होणार असल्यामुळे त्याच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि आजच न्यायालयाचा निर्णय आला आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी म्हणत होतो की हा निर्णय शिवसेनेचा नसून लोकशाहीचा आहे. आज न्यायालयाने दिलेल्या निकालात सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडंनागडं राजकारण, त्याची चिरफाड केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल महोदयांची भूमिका अयोग्य होती. राज्यपालांच्या भूमिकेचंही वस्त्रहरण झालं आहे. राज्यपाल ही यंत्रणा आत्तापर्यंत आदरयुक्त यंत्रणा होती. पण त्याचे धिंडवडे ज्या पद्धतीने शासनकर्ते काढत आहेत, ते पाहिल्यावर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, हा मोठा विचार सर्वोच्च न्यायालयापुढे न्यायला हवा. तूर्त, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नव्हता वगैरे म्हटलंय. पण अपात्रतेचा निर्णय त्यांनी अध्यक्षांवर सोपवला असला, तरी माझ्या शिवसेनेचा आदेश अंतिम असेल हेही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे  - उद्धव ठाकरे

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आम्ही पूर्ण समाधानी आहोतजे लोक कालपर्यंत उड्या मारत होते की आज सरकार जाणारत्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं आहेत्यांच्या चर्चा किती थोतांड होत्यातेही समोर आलं आहे

खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. न्यायालयाने शिंदे गटाला मोठे धक्के दिले आहेत. तसेच राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. दुसरीकडे, १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे पाठवलं आहे. त्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आणि त्यांच्या लोकांनी उगीच पेढे वाटू नये, सरकार वाचलं असं समजून खाजवत बसू नये, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.