मातंग कुटुंबीयांना शिवीगाळ करत केली मारहाण!
आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील घटना अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल,आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी!
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगरगाव येथील हातावर पोट असलेल्या एका गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबीयांना गावातीलच चार जणांनी घरी येऊन धमकावत,शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना दिनांक ४ रोजी दुपारच्या सुमारास घडली पीडित इच्छा शरद डाडर सरदार यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस स्टेशन मध्ये अंबादास दादासाहेब चव्हाण व इतर तिघे यांच्यावर अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,डोंगरगण येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छा शरद डाडर यांच्या राहत्या घरी दि.4 रोजी सुकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान अंबादास दादासाहेब चव्हाण व इतर तिघे घरी येऊन तुझा भाऊ गण्या कुठे आहे,तुम्ही लई माजलात अस म्हणत जातीवर बोलत,शिवीगाळ करत,मारहान करण्यात आली यानंतर पीडित इच्छा शरद डाडर यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस स्टेशन मध्ये अंबादास दादासाहेब चव्हाण व इतर तिघे यांच्यावर भादवि 452,323,504,506 व 34 अंतर्गत ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिव हे करत आहे,यावेळी पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबीयांच्या वतीने मागणी केली आहे.
stay connected