सबका साथ सबका विकास ?

सबका साथ सबका विकास ?

 सबका साथ सबका विकास हे देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे ब्रीद वाक्य.वास्तविक पाहता देश प्रगती कडे चालला आहे की अधोगती कडे हेच कळायला मार्ग नाही.तसे पाहता एकाचा विकास आणि दुसऱ्याचा विनाश असे दिसते .देशाचे धर्माचे नावावर झालेले गढूळ वातावरण त्याचावर  देशाच्या पंतप्रधानाचे मौन काही समजायला होत नाही .काही समाजकंटक काही जातीवादी संघटना काही उपद्रवी हे देशाचे वातावरण खराब करण्याचे काम करू राहिले आहे. यात अल्पवयीन तरुण पिढी ही ज्यास्त प्रमाणात भाग घेताना दिसते .त्याचे भविष्य अंधारमय आहे हे त्यांच्या पालकांच्या लक्षात यायला पाहिजे .कोणताही धर्म वाईट शिकवीत नाही .धर्मातील चांगल्या गोष्टी समजातील प्रत्येक धर्माच्या नागरिकांनी घेतल्या तर परिस्थिती चांगली होईल. या साठी सुज्ञ समजदार लोकांनी एकत्रित येऊन जनजागृती केली पाहिजे .आज आपसातील भांडणाला दोन गटातील दोन समजातील दोन धर्मातील भांडणे असे रूप देऊन त्याचे भांडवल केले जात आहे. ज्या ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात त्या त्या वेळेस असे जातीवादी वातावरण निर्माण करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जाते हे प्रत्येकाला समजते पण उमजत नाही ही दुर्दैवाची बाब आहे . हे के गलिच्छ वातावरण तयार केले जाते त्या मध्ये सर्व सामान्य , गरीब  ,ज्यांचे हातावर पोट आहे अश्या लोकांचे अतोनात हाल होतात हे लक्षात घेतले गेले पाहिजे. ज्या वेळेस अशा घटनेत दगड फेक जाळपोळ होते त्या मध्ये आपण आपल्याच देशाची संपत्ती जी आपल्याच पैशाने जे सरकार आपल्याकडून अनेक प्रकारच्या करातून वसूल करते तीच असते तिचेच आपण नुकसान करतो . माझी प्रत्येक धर्मातील लोकांना हात जोडून विनंती आहे उठा एकत्रित या आपण सर्व मिळून या जातीवादी  संघटना उपद्रवी लोक के देशाचे वातावरण खराब करीत आहे त्यांना धडा शिकवू .आज आपल्या देशाची प्रतिमा जगात बदनाम होत आहे देश पण भ्रष्टाचाराने कमकुवत बनत चालला आहे.आज जर आपण यावर विचार केला नाही तर आपल्या मुलांचे भविष्य खराब आहे यात शंका नाही .आणि निर्भय पने जगता येणार नाही .एक गोष्ट लक्षात ठेवा परमेश्वराला  अती जमत नाही  तो अन्याय सहन करत नाही एखाद्या व्यक्तीला विनाकारण त्रास दिला तर त्याचा तळतळाट तुमची पिढी बर्बाद करण्यास पुरेसा आहे. सरकारने ,प्रशासनाने ,कोर्टाने  आपली जबाबदारी प्रामाणिक पने निभावली पाहिजे .नाहीतर शेवटी परमेश्वर आहेच हिशोब करायला त्याच्याकडे  वसिला चालत नाही ,वकील चालत नाही त्याच्या फैसलेला अपील नाही हे नैसर्गिक संकटतात पाहिले आहे.कोरीना आला त्याने आपल्याला सुधरन्याची संधी दिली पण आम्ही काही बोध घेतला नाही .आजचे वातावरण तसेच झाले आहे बोध घेतला नाही तर अंत जवळ आहे मग तो कोणीही असो श्रीमंत गरीब ,कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा त्याला परमेश्वराच्या दरबारात माफी नाही.

- राशिद मोमिन / कडा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.