गारपीटग्रस्त गावांमध्ये सकाळी उगवतीलाच, आ.सुरेश धस आणि युवा नेतृत्व जयदत्त धस शेतकऱ्यांच्या बांधावर...हजर ****************************** हवालदिल शेतकऱ्यांना दिला धीर

 गारपीटग्रस्त गावांमध्ये सकाळी उगवतीलाच,
आ.सुरेश धस आणि युवा नेतृत्व जयदत्त धस शेतकऱ्यांच्या बांधावर...हजर
******************************
हवालदिल शेतकऱ्यांना दिला धीर

******************************


 आष्टी (प्रतिनिधी)

 आष्टी तालुक्यातील दौलावडगाव गटातील दि.१५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७.३० या अडीच तासात पिंपळगावघाट, देऊळगावघाट, केळ,हरेवाडी, मराठवाडी, बांदखेल, वेलतुरी, शेडाळा,कारखेल,तागडखेल,गहूखेल,चिंचेवाडी  आणि अरणविहिरा या गावांतील परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंब,फळबागा कांदा, मका, कडवळ आणि आंबे या पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

रविवारी सकाळी ७.०० वा. उगवतीलाच आ. सुरेश धस यांनी आणि युवा नेते जयदत्त धस यांनी या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असा धीर यावेळी शेतकऱ्यांना दिला.      

            शनिवारी सायंकाळी झालेली गारपीट ही प्रचंड प्रमाणावर झाली असून त्यामध्ये अर्धा किलो, एक किलो वजनाच्या गारांचा एक ते दीड फुटाचा थर काही ठिकाणी साचला होता.आज ही १५ तासाने देखील गारांचा थर आढळून येत आहे...अनेक घरे पडले तर घरावरील पत्रे जाग्यावर खचले असून, जनावराना गारांचा मारा लागून जखमी झाले आहेत. संत्री,डाळींब,लिंब,आंबा,केळी, फळबागांचे मोठे नुकसान तसेच एकाही झाडांना पाला राहिला नाही... याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांने खचून न जाता प्रशासनासोबत जाऊन आ.सुरेश धस आणि युवा नेते जयदत्त भैय्या धस यांनी नुकसान ग्रस्त परिस्थितीची पाहणी केली.  कारखेल येथील विष्णू उत्तम घुले या शेतकऱ्यांना ५ शेळ्याचा मृत्यू झाल्याने जयदत्त धस यांनी भेट दिली.येत्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण गारपीटग्रस्त भागातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील आणि शासनाने घोषीत केलेल्या दर हेक्टरी नुकसान भरपाई बाबत संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असून शासन दरबारी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहोत असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन धीर दिला आहे. यावेळी तहसीलदार विनोद गुंडमवार,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,मंडळाधिकारी,तलाठी,ग्रामसेवक आदींसह परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.